Published:

कळमेश्वर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार

अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे महसूल मंत्री सह संबंधित प्रशासनास निवेदन
नागपुरः- कळमेश्वर, तालुक्यातील धापेवाडा येथील धनंजय भड यांची शेती सर्वे क्र, ४७५/१ मौजा धापेवाडा(बु.) येथे शेती असून सातबारा उताऱ्यावर आराजी १.२१ हे. आर. ऐवजी ०.७७ हे. आर्. चुकीने नोंद झाली. सदर प्रकरण दि.५/६/२०२० ला दुरुस्ती करिता भूमि अभिलेख कार्यालयास सादर केले परंतु ५ वर्षाचा कालावधी होऊनही सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती केली नाही धनंजय भड यांचे शेती शेजारी असलेले रमेश राजगुरे रा. धापेवाडा यांनी कुठलाही आदेश नसताना धनंजय भड यांचे मालकी कब्जातील शेतीतील सीमेवरील असलेले सिमेंट पोल उपडून जवळपास एक एकर शेतीचे आत रमेश राजगुरू यांनी सिमेंट पोल गाडून अतिक्रमण केले. याबाबत संबंधित विभागास न्याय मिळण्याकरिता धनंजय भड यांनी तक्रार केली परंतु त्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही सदर प्रकरणात धनंजय भड यांचें आर्थिक नुकसान होत असून त्यांचेवर अन्याय झाल्याने न्याय मिळण्याकरीता तसेच कळमेश्वर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील निष्क्रिय उपअधीक्षक शिंदे यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे विदर्भ महासचिव महेंद्र सातपुते यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री सह सबंधित प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे केली असून शेतकऱ्यास न्याय न मिळाल्यास समिती तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला. शिष्टमंडळात राजेंद्र नवघरे गोपाल धोटे आदींचा समावेश होता.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: कळमेश्वर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार, ID: 30596

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर