साकरीटोलाः- (दि.17) साकरीटोला येथे जमिन खरेदी विक्री प्रकरणात कुणाची जमीन कोण विकतो घोण घेतो यांची जागेवर कोणतीही चौकशी नाही. मौजा सलंगटोला येथील संदिप हनु सरोजकर व इतर रा.सलंगटोला ता.सालेकसा जिल्हा गोंदिया तसेच राजु संपतराव काळे व इतर रा.साकरीटोला तह.सालेकसा जिल्हा-गोंदिया येथील रहीवाशी असुन यांची मौजा सलंगटोला त.सा.क्र.16 येथील भुमापन क्र.287 आराजी 0.49 हे.आर.लगान 1.10 रु हक्क वर्ग 1 शेतजमीन सामुहीक खात्यात होती. त्यापैकी श्री.जितेंद्र कारु सरजारे व उमेश कारु सरजारे यांच्या पासुन श्री.राजुु संपतराव काळे यांनी गट नं.भुमापन क्र.287 आराजी 0.49 पैकी 0.25 हे आर.दस्त क्र.531 दि.03/10/2022 ला खरेदी केली व या खरेदीच्या आधारे श्री- राजु संपतराव काळे रा.साकरीटोला भुमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करुन गाव नकाशामध्ये 287आराजी 0.49 हे आर.जमीनीचे दोन भागात विभागणी करण्यात आली. भुमापन क्र.287/2 आराजी 0.25 हे आर.हनु मोतीराम सरोजकर यांचे वारस सुनिल हनु सरोजकर यांचे भुमापन क्र.287/1 पश्चिमेस झुडपी जंगल उत्तरेस भुमापन क्र.284 पारबताबाई हरिदास गजभिये व इतर यांची शेतजमीन तसेच दक्षिणेस साकरीटोला ते सातगाव जाणारा रस्ता आहे. भुमापन क्र.287/1 आराजी 0.24 हे आर.श्री.सुनिल हनु सरोजकर व रमण साधुराम शहारे व इतर यांचे जमिनीची चतुर्सिमा गाव नकाशा प्रमाणे पुर्वेस भुमापन क्र.288 सौरभ राजेश अग्रवाल भुमापन क्र.289 सौरभ राजेश अग्रवाल 290 अजय वसंतराव उमाटे पश्चिमेस 287/2 राजु संपतराव काळे व इतर उत्तरेस भु.क्र.284 पारबताबाई हरिदास गजभिये व इतर यांची शेत जमिन तसेच दक्षिणेस साकरीटोला ते सातगाव रोड अशाप्रकारे गाव नकाशा नुसार चतुर्सिमा दाखवत आहे. मुळ मालक आपल्याच जागेत असतांनी राजु संपतराव काळे यांनी जितेंद्र कारु सरजारे यांची जागा मागील भागातील खरेदी केली आहे.287/1 हा हिस्सा संदिप हनु सरोजकर व जितेंद्र कारु सरजारे यांची आहे. भुमापन क्र.287/2 आराजी 0.25 हे आर जमीन राजु संपतराव काळे यांची जमिन मागे असुन त्यांनी 281/1 गटात दाखविल्यामुळे मोठा घोळ साकरीटोला येथे आहे.महसुल विभाग सविस्तर चौकशी करित आहे.




