सालेकसात ‘वंदे मातरम’तुन गुंजला देशभक्तीचा हुंकार

🔽राष्ट्रीय एकात्मता व मातृभूमीप्रेमाचा संदेश:
🔽150वा सार्धशताब्दी सोहळा जल्लोषात
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ या तेजस्वी काव्याच्या गीताने यंदा 7 नोव्हेंबर रोजी 150व्या वर्षात प्रवेश केले. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन सोहळा जनजाती नेता गुंडाधूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सालेकसा यांच्या वतीने दि. 7 रोजी सालेकसा येथील तहसील कार्यालयाचे प्रांगणात नियोजित वेळी सकाळी 9.50 वा. वंदे मातरम गीताचा सामूहिक गायन सोहळा अत्यन्त जल्लोषात पार पडला.

देशभक्तीच्या भावनेने भरलेला हा कार्यक्रम परिसरात एकात्मता आणि राष्ट्रभिमानाचा संदेश देत गुंजत राहिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार नरसाय्या कोंडागुर्ले उपस्थित होते. प्रमुख वक्ते रामकृष्ण महाविद्यालय कुऱ्हाडीचे प्रा. किशोर पटले यांनी वंदे मातरम गीताच्या ऐतिहासिक पाश्वभूमीवर सविस्तर प्रकाश टाकला. यावेळी शंकरलाल अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. एस.नारायणमूर्ती, सहा.आयुक्त कौशल्य विकास विभाग गोंदियाचे आर.एन. माटे, पोलीस निरीक्षक भूषण बुराडे, शिक्षण संस्थेचे डाँ. राजेंद्र बडोले, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, गडकिल्ले संवर्धन समितीचे रामेश्वर पंधरे, व्यवसायी कपूरचंद अग्रवाल, महिला गटाच्या शालूताई साखरे, जनजाती चेतना समितीचे योगेश राहागंडाले, मोक्षधाम समितीचे सुनील असाटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी.एन. तुमडाम प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
नाटिकेतून एकात्मतेचा संदेश
दरम्यान विध्यार्थ्यानी वंदे मातरम गीतावर लघु नाटिका आणि बिरसा मुंडा आदिवासी आश्रम शाळेच्या विधार्थिनी देशभक्तीवर गीताचे सुंदर सादरीकरण करत एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी विविध शैक्षणिक संस्था मधील विध्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विध्यार्थी, महिला बचत गट, संस्था व संघटनाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विध्यार्थी व कर्मचाऱ्यांनीं परिश्रम घेतले. संचालन पी.डी.जांभूळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ. कांबळे यांनी मानले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सालेकसात 'वंदे मातरम'तुन गुंजला देशभक्तीचा हुंकार, ID: 30740

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर