🔽सालेकसात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला
साखरीटोला/सालेकसा
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 27 रोजी भारतीय जनता पक्षाचा सालेकसा येथे विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना आ. चित्रा वाघ यांनी नप क्षेत्रातील शहरीकरणासोबत आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, अश्या पायाभूत सुविधाची गरज असते नप क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी तसेच सुखा दुःखात धावून येणारे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डाँ. राजेंद्र बडोले व सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आव्हान करत आम्ही सर्व सामान्य जनेतच्या विकासासाठी काम करतो भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात नेतृत्व जनतेतून तयार होतं. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड म्हणून जगात एस्टॅब्लिश होतो. अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. त्या ब्रँडचं नाव राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र मोदी असं आहे म्हणाल्या, 2 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेतेही प्रचारात उतरले असून तहसील कार्यालय सालेकसाचे मैदानात भाजप आरपीआय (आठवले) तथा पीरिपा (कवाडे) समर्थित अधिकृत उमेदवाराचा निवडणूक प्रचार व विजय संकल्प मेळाव्यात आ. सौ. चित्राताई वाघ, आ. संजय पुराम, जिल्हाध्यक्ष सौ. सीताताई रहांगडाले, डाँ. राजेन्द्र बडोले, नरेंद्र बाजपेई सौ. सविता पुराम, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. येसुलाल उपराडे, देवराम चूटे, भाजपचे सर्व उमेदवार, विविध आघाड्यांतील पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, महिला मोर्चा प्रमुख, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





