शेतकऱ्यांना केंद्रपुरस्कृत पशुसंवर्धनच्या योजना मंजूर करा, गृहराज्य मंत्री, तथा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क मंत्री डाँ. पंकजभाऊ भोयर यांना निवेदन
साखरीटोला/सालेकसा-:
जिल्हा व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्रपुरस्कृत पशुसंवर्धनच्या योजना मंजूर करा असे निवेदन राज्याचे गृहराज्य मंत्री, तथा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क मंत्री डाँ. पंकजभाऊ भोयर, व क्षेत्राचे आमदार संजयभाऊ पुराम यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांना देण्यात आले. राष्ट्रीय पशुधन अभियान एनएलएम योजनेत प्रास्तावित शेतकऱ्यांचे अनेक प्रस्ताव काही कारण नसतांना मागील 3 वर्षांपासून शासन दरबारीं धुळखात पडून आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले. पशुधन अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कागदपत्राचा पाठपुरावा केला. बँकेने कर्जपुरवठ्याची हमी दिली, प्रकरण मंजूर झाले पण अनुदानासाठी प्रस्ताव बँकेत पाठवले नाही. नौकरी मिळत नसल्याने पशुपालन व दुग्ध व्यवस्थापन विषयात पदवीधर, व पदवीकाधारक युवा शेतकऱ्यांनी या योजनेतून व्यवसाय सुरु करावा म्हणून अर्ज केले होते. पण तीन वर्षापासून प्रस्ताव शासन दरबारीं पडून असल्याने शेतकऱ्यांसह पदवीकाधारक सुद्धा निराश झाले हे उल्लेखनीय आहे. पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी प्रदान करून अनुदानासाठी बँकेत पाठवण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. निवेदन देते वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष देवराम चुटे, नगरसेवक डाँ. राजेंद्र बडोले, डेकाटे, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, जिल्हा भाजपचे पदाधिकारी टिकेश बोपचे, सुनील अग्रवाल, वरिष्ठ नेते हनुमंतरावजी पुराम व पदाधिकारी उपस्थित होते.




