भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुक 2026
साखरीटोला/सालेकसा- (रमेश चुटे)
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकित भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांनी दमदार विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत हा विजय संपादन केला असून, मतमोजणीत ब्राम्हणकर यांना विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. १८ जून रोजी ४५७ मतदारांनी (१०० टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. आज २२ जून रोजी मतमोजणी पार पडली आणि त्यातून अविनाशभाऊ ब्राम्हणकर विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. यात भाजपचे अविनाशभाऊ ब्राम्हणकर यांना 352 मते मिळाली तर कांग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वर यांना 154 मते मिळाली आहेत. तर एक मत अवैध झाले आहे. या जागेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.


