देवरीः- ओबिसी समाज हा सांविधानिक प्रवाहाच्या दिशेत पाहीजे त्या प्रमाणात न आल्यामुळे समाजाला सांविधानिक अधिकार न समजल्यामुळे समाज आज ख-या दिशा चुकला आहे.ओबिसी समाज हा भारताच्या 65 टक्के अर्थ व्यवस्थेचा कणा आहे.भारत देशातील संपुर्ण व्यवस्थेला चालविणारा ओबिसी समाज हा कुणाच्या दबावाखाली आपले अधिकार प्राप्त करुन घेत नाही.यांचा अभ्यास करण्याची गरज आहे. ओबिसी समाजाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.ओबिसी समाजात गौतम बुध्द,अशोक सम्राट,माहात्मा फुले,शाहु महाराज,सावित्रीबाई फुले.अहिल्याबाई होळकर,छत्रपती शिवाजी महाराज हे ओबिसी मधील महापुरुष जन्माला आले आहेत.ओबिसी समाजातील महापुरष यांनी समानतेची लढाई लढली आहे. ओबिसी समाजातील महापुरुषांनी न्याय,बुधता,समानतेची लढाई लढुन समाजाला न्याय देण्याचे काम केले.आज आपण ज्यांना सत्तेत बसविले ते लोग आम्हाला माणुस म्हणुन घ्यायला तयार नाही.आमची मोजणी करायला तयार नाही म्हणजेच आमची किंमती किती आहे हे ओबिसी समाजाने समजले पाहीजे.ओबिसी समाजातील काही नेते हे आपले पोट भरण्यासाठी त्यांच्या मागे पुढे फिरत असतात.त्यांना समाजाचे काही देण नसते. ओबिसी समाजाने सांविधानिक अधिकार समजणे काळाची गरज आहे.ओबिसी समाज आज 65 टक्के असुन सांविधानिक पदावर विराजमान व्हायला पाहीजे तो झालेला नाही यांचे कारण त्यांनी आज पर्यंत सांविधानिक अधिकारासाठी संर्घष न केल्यामुळे न्याय मिळाला नाही. ओबिसी समाजातील युवक वर्गानी स्वतःचे अधिकार वाचविण्यासाठी संघटित होणे काळाची गरज आहे.आपले अधिकार,आपले प्रतिनिधित्व घेणे आवश्यक आहे.



