गोंदिया – भारतातील शेतकरी वर्ग हा एवढया मोठ्या संकटात का आला या मागील पाश्वभुमी समजणे शेतकरी वर्गासाठी महत्वाची आहे.शेतकरी वर्गाच्या विकासासाठि सरकार भरपुर योजना आणण्याचे दाखविले जाते.पण प्रत्यक्षात शेतकरी वर्गाला जे पाहीजे त्याकडे सरकार दुर्लक्ष करित असल्यामुळे सरकार च्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे सामान्य जनतेला मोर्चा काढावा लागत आहे. आज ३०/०९/२०२६ रोज बुधवारला ठिक 12.00 वाजे उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया येथे हा मोर्चा थांबणार आहे.शेतकरी यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत. १) शेतक-यांना सन २०१७ वर्षापासुन थकीत असलेल्या धानावरील बोनसची रक्कम प्रति हेक्टरी रु.२५००/- रुपये देण्यात यावी. २) शेतक-यांना शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा देण्यात यावा. ३)शेतक-यांना खतांच्या किंमतीत कपात करण्यात यावी. ४) शेतक-यांचा शेतीसाठी नविन वीज कनेक्शन तात्काळ देण्यात यावे. ५) मा.गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चे 5 लक्ष करावे. ६) शेतक-यांच्या धानाला ५००० हजार रुपये प्रति क्विंटल रेट द्यावा. ७) गोंदिया जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे. ८) गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांच्या तुटलेल्या झाडांना साठवन करण्याची परवानगी देण्यात यावी. भारतीय किसान बचाव संघाने संपुर्ण जिल्हयातील शेतकरी बांधवाना आव्हान केला आहे.




