मानकापूर स्टेडियमवरील मतमोजणी केंद्र व निवडणूक तयारीचा निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडून आढावा

सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

                                      नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक

​नागपूर, दि. १८ – नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. याअनुषंगाने निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज मानकापूर स्टेडियम येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय येथे प्रशासकीय तयारीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना करीत सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

​ पाहणीदरम्यान त्यांनी मानकापूर स्टेडियम येथील मतमोजणी टेबलची रचना, बैठक व्यवस्था, उमेदवार व पोलिंग एजंट यांच्या बसण्याची व्यवस्था तसेच मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात येणाऱ्या ‘स्ट्रॉंग रूम’ची पाहणी केली. याशिवाय, मतमोजणीच्या दिवशी होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली व मानकापूर स्टेडियम येथील नागपूर जिल्ह्याच्या ‘साहित्य स्वीकृती केंद्राची’ही माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदूरकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​सरपंच भवन येथून पोलिंग पार्ट्या होणार रवाना

निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सरपंच भवनाला भेट देऊन नागपूर जिल्ह्यातील पोलिंग पार्ट्यांच्या प्रस्थान तयारीचा आढावा घेतला. सरपंच भवनातून पोलिंग पार्ट्या रवाना होणार असून, तिथे मतपत्रिकांसाठी तयार करण्यात आलेली स्ट्रॉंग रूम, साहित्य वितरणासाठी मांडण्यात आलेले टेबल आणि गाड्यांच्या ये-जा करण्याच्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.

​विभागीय आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक

यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या तयारीचा सखोल आढावा त्यांनी घेतला. निवडणूक शाखेकडून निवडणुकीच्या तयारीची सविस्तर माहिती सादर करण्यात आली. निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून पूर्णत्वास आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त विभागीय आयुक्त तुषार मठकर, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदूरकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांचा निवासाचा पत्ता कॉटेज नं. ७ रवी भवन, नागपूर असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ८२०८५४०१९० असा असल्याचे निवडणूक विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: मानकापूर स्टेडियमवरील मतमोजणी केंद्र व निवडणूक तयारीचा निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडून आढावा, ID: 31162

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर