ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे व वितरणास प्रतिबंध

    जिल्ह्यातील सर्व संबंधित सेवा केंद्रांना कार्यवाही तात्काळ थांबविण्याचे निर्देश
गोंदिया, दि. 19 : ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे, त्याची छपाई करणे तसेच त्याचे वितरण करणे ही कार्यवाही अनधिकृत व नियमबाह्य असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातील सर्व संबंधित सेवा केंद्रांनी अशा प्रकारची कार्यवाही तात्काळ थांबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना फार्मर आयडी प्रदान करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला फार्मर आयडी हा शेतकऱ्यांच्या नोंदणीशी संबंधित असून, त्याच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे, त्याची छपाई करणे किंवा त्याचे वितरण करणे यासाठी शासनाची अधिकृत मान्यता आवश्यक आहे. अशा प्रकारची मान्यता नसताना स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे अथवा वितरित करणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित सेवा केंद्रांनी फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे, त्याची छपाई करणे आणि त्याचे वितरण करणे ही प्रक्रिया तात्काळ बंद करावी. तसेच, या संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना व सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनीही या सूचनांची नोंद घेऊन फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करून देण्याबाबत होणाऱ्या दाव्यांबाबत सतर्क राहावे. शासनाची अधिकृत मान्यता नसलेल्या ओळखपत्रांसाठी कोणतीही कार्यवाही करू नये. तसेच, यासंदर्भातील अधिकृत माहिती व सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे व वितरणास प्रतिबंध, ID: 31174

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर