पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली बोदलकसा धरणाची प्रत्यक्ष पाहणी

गोंदिया, दि. 21 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी जिल्हा दौऱ्यादरम्यान बोदलकसा मध्यम प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. धरणाच्या डाव्या कालव्यावरील विमोचकाजवळ धरणाच्या पाळीचा भाग फुटल्याच्या घटनेची माहिती घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी आमदार विजय रहांगडाले, तहसीलदार नारायण ठाकरे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव कुरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे आणि तालुका कृषी अधिकारी आकाश गेडाम उपस्थित होते.
बोदलकसा मध्यम प्रकल्प हा गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येत असून, या ब्रिटिशकालीन धरणाचे बांधकाम सन १९१७ मध्ये पूर्ण झाले होते. या प्रकल्पाला १०९ वर्षे पूर्ण झाली आहेत. धरणाच्या डाव्या कालव्यावरील विमोचकाजवळ पाळीचा भाग फुटल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी मंदार पत्की, जलसंपदा विभाग, नागपूरच्या मुख्य अभियंता सोनाली चोपडे आणि भंडारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. धरणाच्या फुटलेल्या भागाची तातडीने दुरुस्ती करून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंद करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
त्यानंतर गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव कुरेकर, उपकार्यकारी अभियंता संजीव सहारे, उपविभागीय अभियंता चंद्रकांत डोंगरे, कनिष्ठ अभियंता अभिषेक यादव यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. या कामासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न केले. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फुटलेल्या भागातून होणारा पाण्याचा विसर्ग नियंत्रित करून तो बंद करण्यात यश आले आहे.
पाण्याचा विसर्ग नियंत्रित केल्यामुळे धरणाच्या खालील भागातील गावांना कोणताही धोका निर्माण झालेला नसून, तेथील शेती आणि पिकांचेही नुकसान झालेले नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.
धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात. तसेच धरणाच्या फुटलेल्या पाळीच्या भागाची आणि सांडव्याची पुनर्बांधणी करण्याचे काम प्राधान्याने हाती घेऊन ते वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी दिले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली बोदलकसा धरणाची प्रत्यक्ष पाहणी, ID: 31184

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर