नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक

        ६  जिल्ह्यांतील मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियोजन पूर्ण           २ हजार ५३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती             ​नागपूर, दि. २१- नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. संपूर्ण विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या मतदान पथकांची आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभागात शासनाच्या एकूण २ हजार ५३५ अधिकारी आणि कर्मचारी या निवडणुकीच्या थेट कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली आहेत.

​विभागातील जिल्ह्यांच्या नियोजनाचा विचार करता, नागपूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक म्हणजेच २४६ मूळ आणि ४० आरक्षित अशी एकूण २८६ मतदान पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकात पाच (१+४) कर्मचारी याप्रमाणे १ हजार ४३० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, तितकेच म्हणजेच १,४३० राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. याशिवाय केंद्र सरकारचे २५० अधिकारीही नागपूर जिल्ह्यात मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये ४१ मूळ व ८ आरक्षित मिळून ४९ पथकांसाठी राज्य शासनाचे २४५ कर्मचारी आणि केंद्र सरकारचे ५० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात ३५ मूळ व ८ आरक्षित अशा ४३ पथकांसाठी २१५ राज्य कर्मचारी आणि ४५ केंद्रीय अधिकारी सज्ज आहेत.
​त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात ३९ मूळ व ६ आरक्षित अशा ४५ पथकांसाठी २२५ राज्य कर्मचारी आणि ४० केंद्रीय अधिकारी उपलब्ध झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ५८ मूळ आणि ७ आरक्षित अशा ६५ पथकांसाठी २६० राज्य कर्मचारी व ६५ केंद्रीय अधिकारी तैनात असणार आहेत.नक्षलग्रस्त व संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात २६ मूळ आणि ६ आरक्षित पथकांसाठी राज्य शासनाचे १६० कर्मचारी, केंद्र सरकारचे २६ अधिकारी आणि केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे ३२ अधिकारी विशेष स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.​संपूर्ण नागपूर विभागात एकूण २ हजार ५३५ राज्य शासकीय अधिकारी, ४७६ केंद्र शासकीय अधिकारी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी ३२ सेंट्रल पीएसयू अधिकारी असे एकूण मनुष्यबळ उपलब्ध झाले असून, निवडणूक अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.                         

 

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक, ID: 31190

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर