एस-१४ वेतनश्रेणीप्रमाणे नोव्हेंबरचे वेतन निघणार; चार दिवसांत वेतननिश्चिती कॅम्प आयोजित करण्याचे गटशिक्षणाधिकारी यांचे आश्वासन

शिक्षक समिती शाखा देवरीचे गटशिक्षणाधिकारी गणेश टाकसाळे यांना एस-१४ संदर्भात निवेदन

देवरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरीच्या वतीने प्राथमिक शिक्षकांच्या सुधारित एस-१४ वेतनश्रेणीच्या वेतननिश्चिती संदर्भात गटशिक्षणाधिकारी गणेश टाकसाळे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी साहेबांनी शिक्षक समितीला सकारात्मक आश्वासन देताना माहे नोव्हेंबरचे वेतन सुधारित वेतनश्रेणीप्रमाणेच काढण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच वेतननिश्चितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चार दिवसांत तालुकास्तरावर वेतननिश्चिती कॅम्प आयोजित करण्यात येईल आणि सर्व संबंधित शिक्षकांची सेवापुस्तके वेतननिश्चितीच्या मंजुरीसाठी याच महिन्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो), जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन दिले.२९ फेब्रुवारी २०२४ च्या सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदाची सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. सदर लाभ २००२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षकांना लागू होणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांची २००२ पासून सुधारित वेतननिश्चिती करून वेतनातील फरकाची थकबाकी मिळण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची मंजुरी आवश्यक आहे.याच अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या आदेशानुसार तत्काळ वेतननिश्चिती करून सेवापुस्तके मंजुरीसाठी कॅफो साहेबांकडे पाठविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी एस जी वाघमारे उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, तालुकाध्यक्ष गजानन पाटणकर, तालुका सरचिटणीस मिथुन चव्हाण, सुरेश कश्यप, रामेश्वर वाघाडे, सतीश भोंडगे, विनोद बहेकार, मुकेश गणवीर, धीरज शहारे, रवी जाधव, गणेश कांगणे, सचिन सांगळे, वीरेंद्र खोटेले, प्रिन्स गजभिये, नंदेश्वर कवास, अंकुश पवार, सुनील राठोड, पंकज राठोड, कु. सरोज निमजे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.                                                                                                 शिक्षक समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एस-१४ वेतननिश्चितीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ माहे नोव्हेंबर महिन्यापासून मिळण्यासाठी शिक्षक समिती आग्रही भूमिकेत राहील.जिल्हास्तरावर तालुकानिहाय कँप आयोजित करण्याची मागणी जिल्हा संघटनेकडून केली जाईल..शिक्षक समितीची मागणी निकाली काढल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष तसेच सर्व विभागप्रमुख यांचे आभार”                                                                                                                                                                                          संदीप तिडके
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: एस-१४ वेतनश्रेणीप्रमाणे नोव्हेंबरचे वेतन निघणार; चार दिवसांत वेतननिश्चिती कॅम्प आयोजित करण्याचे गटशिक्षणाधिकारी यांचे आश्वासन, ID: 31283

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर