देवरीः- MRP पेक्षा जास्त पैसे घेणे – सर्वात मोठी लूट
महाराष्ट्रात सरकारने देशी दारूची किमान किरकोळ किंमत ठरवून दिली आहे.180 ml देशी दारू = ८० रुपये
पण प्रत्यक्षात दुकानात ९०, १००, रुपये घेतले जातात. आज देवरीत तर ८० रुपयांची दारू ८५ रुपयांना विकल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. रेट लिस्टच न लावणे नियमानुसार दुकानाबाहेर दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. पण अनेक दुकानांत रेट लिस्टच नसते. त्यामुळे ग्राहकाला खरा दर कळतच नाही. तपासणीत हेच आढळले – “रेट लिस्ट गायब, ठरविल्या दरापेक्षा अधिक वसूली” सुट्टे नाहीत म्हणून जास्त घेणे
“10 रुपये सुट्टे नाहीत” म्हणून ८० ची बाटली ९० ला देणे, हा सगळ्यात कॉमन बहाणा आहे सण / त्यौहारच्या नावावर वसूली
दिवाळीत देवरीत ८० रुपयांच्या बाटलीसाठी ९० रुपये मागितले, विरोध केला. तर ग्राहकांना शिवीगाळ करणा-या घटना घडल्या आहेत.
बिल दिले तर पुरावा राहतो म्हणून बिलच देत नाहीत. बिल नसेल तर तक्रार करता येत नाही. ड्राय डे ला चोरून विक्री
ड्राय डे ला दुकान बंद दाखवून मागच्या ८० रुपयांची बाटली १०० रुपयांना विकल्याची तक्रारी ग्राहकांकडुन येतात राज्य उत्पादक शुल्क विभागाने तात्काळ चौकशी केली पाहीजे.शासन्य मान्य दुकानासमोर प्रत्येक दारुचे रेट बोर्ड लावणे गरजेचे आहे सामान्य लोकांची लुट होवु नये याकडेे संबधीत विभागाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी सामान्य जनतेची आहे.



