Published:

शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार साजरी करावी?; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

पुणे : जवळपास दोन वर्षांनंतर जाहीर सभा घेणारे राज ठाकरे यांनी बुधवारी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या जाहीर सभेमध्ये विविध मुद्द्यांवरून तुफान राजकीय फटकेबाजी केली.

यावेळी राज ठाकरें यांनी शिवजयंतीच्या मुद्द्यावर मनसेची भूमिकाही स्पष्ट केली. तसेच येत्या २१ मार्च रोजी शिवजयंती तिथीनुसार धुमधडाक्यात साजरी करा, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले.

राज ठाकरे म्हणाले की, २१ मार्च रोजी शिवजयंती आहे. शिवरायांमुळे आपली ओळख आहे. आम्ही कोण? आम्ही मराठी भाषा बोलणारे लोक शिवछत्रपतींनी ज्या भागात राज्य केले त्या भागात राहतो. शिवजयंती कधी साजरी करावी, असा प्रश्न विचारला जातोय. शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार साजरी करायची असा प्रश्न विचारला जातोय. मी तर म्हणतो ३६५ दिवस शिवजयंती सारजी करा. शिवजयंती ही तिथीनुसार साजरी केली गेली पाहिजे. कारण शिवजयंती ही आपल्यासाठी एक सण आहे.

आपले सण हे तिथीनुसार साजरे केले जातात. गणेशोत्सवर हा तिथीनुसार होतो. गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवाची तारीख आणि यावर्षीच्या गणेशोत्सवाची तारीख ही वेगवेगळी येते. आपल्या राजाचा जन्मदिवस हा सण आहे. ती कुणाची जयंती नाही. त्यामुळे येत्या २१ मार्च रोजी धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

Source link

Author:

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार साजरी करावी?; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…, ID: 28005

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर