साखरीटोलाः- (रमेश चुटे)महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय मंत्री, तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार 20 मे रोजी सालेकसा तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलप्रभावी क्षेत्र मुरकुटडोह (दडांरी) येथील नवनिर्मित भव्य पोलीस मदत केंद्र इमारतीचे उदघाटन करण्यासाठी आले असता पंचायत समिती सदस्या अर्चनाताई मडावी यांनी आमगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामे करण्यात यावे यासाठी निवेदन दिले आहे. यात सालेकसा तालुक्यातील नानव्हा, बिंझली, झालिया 12 कि.मी. रस्ता बांधकाम, धानोली ते बाम्हणी 4 कि.मी. रस्ता बांधकाम, धानोली ते पिपरटोला नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकाम करणे, नानव्हा मार्गावरील कुवाढास नाल्यावरील पुलाची उंची वाढविने, धानोली ते साखरीटोला मार्गावरील पुलाचे नव्याने बांधकाम करून उंची वाढविने, आमगाव तालुक्यातील कालीमाटी ते कोसमटोला 4 कि.मी.रस्त्याचे बांधकाम, फुक्कीमेटा ते आम्बेतलाव 5 कि.मी. व आंबेतलाव ते चीचटोला रस्त्याचे बांधकाम, देवरी तालु्यातील चिचगड ते ककोडी 23 कि.मी. रस्त्याचे बांधकाम, देवरी तालु्क्यातील चिचगड ते पालांदुर रस्त्याचे बांधकाम, कचारगड देवस्थान क्षेत्रामध्ये 15 राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी राहण्यासाठी कायम निवास व्यवस्था शासनाकडून करण्यात यावे, जंगलातील तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या मजुरांना सर्पदंश, विंचूदंश, जंगली वन्यप्राणी तसेच उष्माघातापासून मृत्यू मुखी पडल्यास त्यांना रुपये वीस लाख विमा सुरक्षा देण्यात यावे, कोटीटोला प्रकल्प (नवाटोला) येथे नवीन धरण बनविण्यात यावे जेणे करून सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकासाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था होईल यामुळे ग्रामपंचायत पिपरिया, पाउडदौना, रोंढा, कहाली, निंबा, कोसमतर्रा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील शेती सिंचनाखाली येईल असे निवेदन भाजपच्या महिला पदाधिकारी व पंचायत समितीच्या सदस्या सौ. अर्चना अंबरलाल मडावी यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: क्षेत्राच्या विकासासाठी पालक मंत्री मुनगंटीवार यांना निवेदन, ID: 28357
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: क्षेत्राच्या विकासासाठी पालक मंत्री मुनगंटीवार यांना निवेदन, ID: 28357
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]