गोरेगांवः- (कृष्णा ब्राम्हणकर) गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात ओबीसी कार्यकर्ता प्रबोधन मेळावा घेण्यात आला. सर्व तालुक्यातील कार्यकर्ता सभेला उपस्थित होेते.प्रबोधन सभेमध्ये 1) ओबीसी आंदोलनाला व्यापक रुप देणे.2) 7 ऑगष्ट मंडल आयोग दिन म्हणजे ओबीसी अधिकार दिन म्हणुन प्रचार प्रसार करणे.3)ओबीसी शिष्यवृत्ती व उपघटक योजनेच्या अंमलबजावणी अडसर समजुन घेणे.4)महाज्योती संस्थेमार्फत ओबीसी,एस.बी.सी,विजे,एनटी,विद्यार्थीसाठी राबवित असलेल्या य़ोजनांची माहीतीचा प्रसार करणे.5)ओबीसी जनगन्नेचेे महत्व व विरोधकांचे षढयंत्र समजुन घेणे.6)भांडवलवाद्यांच्या निजी भारतात व संवैधानिक भारतातील फरक समजुन घेणे.7)ओबीसी समाजाची दशा व आंदोलनाची दिशा समजुन घेणे.8) मंडल यात्रा २०२३ चेे नियोजन करणे. सभेमध्ये मार्गदर्शन करतांनी मा.उमेश कोर्राम (अध्यक्ष ओबीसी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडीया ) यांनी मंडल आयोगाबदल सविस्तर चर्चा करुन सर्व ग्रामीण भागीतील ओबीसी पर्यंत जनजागृती व्हावी यांसाठी नागपुर पासुन सुरु होवुन ती सुंपु्र्ण पुर्व विदर्भात निघेल.त्यासाठी प्रत्येक गावात ओबीसीना जागृत करणे व सभा घेणे.त्यानंतर मा.बळीराज धोटे (अध्यक्ष ओबीसी फेडेरेशन ) यांनी संपुर्ण जिल्ह्यातील ओबीसींच्या सांविधानिक अधिकाराबाबद माहीती द्यावी व सर्वांना 26 नोव्हेंबर 2023 संविधान दिवसाला भव्य विराट मोर्च्याला सर्व महीला,विद्यार्थी व पुरुषांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले.तसेच मा.बबलुजी कटरे(अध्यक्ष ओबीसी संर्घष कृती समिती गोंदिया ) यांनी ओबीसी शेतक-यांची पिढवणुक सरकार कशा पध्दतीने करते यावर सविस्तर माहीती दिली.ओबीसी वर्ग धर्म व मुस्लिम विरोधात जास्त विचार करतो पण स्वतःच्या अधिकारांसाठी एकत्रित येत नाही.ही शोकांतिका आमच्या ओबीसीची आहे.ओबीसी प्रबोधन सभेतील सर्व कार्यकर्त्यांनी ओबीसी लोकांना समजावुन माहीती देणे व आंदोलनात सहभागी करुन घेणे. मा.खेंमेंद्र कटरे,मा.लंजेची उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुत्रसंचालन मा.भुमेश ठाकरे यांनी केले. प्रस्ताविक मा.सावन कटरे यांनी केले.आभार प्रर्दशन मा.येळे सर यांनी केले.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: ओबीसी कार्यकर्ता प्रबोधन सभा संपन्न, ID: 28363
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: ओबीसी कार्यकर्ता प्रबोधन सभा संपन्न, ID: 28363
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]