आमगांव:- (मनोज भालेकर) कृषि उत्पन्न बाजार समिती बनगांव (आमगांव) या ठिकाणी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत रब्बी / उन्हाळी हंगाम २०२२-२३ वर्षाकरिता धान खरेदीचा शुभारंभ आज दि. २२/०५/२०२३ ला गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या हस्ते फित कापुन उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार आमगांव-देवरी क्षेत्राचे मान. भेरसिंह भाऊ नागपुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गोंदिया तथा सभापती केशवराव मानकर,माजी अध्यक्ष जि.प.गोंदिया विजयभाऊ शिवणकर. पं.स.सभापती राजेंद्र गौतम,उपसभापती मोहरलाल चौधरी,संचालक संजय नागपुरे,संचालक सचिन अग्रवाल,संचालक सोमेश असाटी,ता.महामंत्री राजु पटले, नरेंद्र वाजपेयी,सचिन गजानन चुटे,तसेच कार्यकर्ते व समस्त कर्मचारी वृंद.. कृषि उत्पन्न बाजार समिती, आमगांव उपस्थित होते.
