साखरीटोला-: (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील ग्राम पंचायत भजेपार तर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या अनुषंगाने आज 22 मे रोजी 27 रुग्णांची पहली खेप नागपूर येथील महात्मे नेत्र रुग्णालयासाठी रवाना करण्यात आले आहे. नागपूर येथील प्रतिष्ठित महात्मे नेत्र रुग्णालयाकडून आलेल्या वाहनाने भजेपार येथील 27 रुग्ण नागरिक येथून रवाना झाले. यावेळी रुग्णांना रवाना करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी ग्राम पंचायत भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, उपसरपंच कुंदाबाई ब्राम्हणकर ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा 24 मे रोजी दुसरी आणि 26 मे रोजी तिसरी खेप रवाना होणार आहे. निवड झालेल्या रुग्णांनी तत्काळ संपर्क साधून आपली मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घ्यावे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता जाते वेळी आपल्या सोबत दोन दिवस पुरतील एवढे कपडे, आधार आणि राशन कार्डच्या प्रत्येकी 2 झेरॉक्स प्रति चादर, पाणी बॉटल, ग्लास आणि घरच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घेऊन जावे असे आव्हान ग्रामपंचायत भजेपार कडून करण्यात आले आहे.
