आमगांवः- (आमगाव) ः- सोमवार दि.२२/०५/२३ ला संगम महिला ग्रामसंघ ,चंगेरा ची वार्षीक सर्वसाधारण सभा सकाळी ठीक १०.३० वाजेपसून शादी खाना हॉल येथे घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. लालसिंगजी पंधरे ( सरपंच ), मा.हंसराजजी गजभिए, (ग्राम सेवक) मा. जाकिर खान ( यूवा संगठन उपाध्यक्ष), बबिता ताई ( CLF लेखापाल ), मीरा ताई ( ग्रा.प. सदस्या), फूंडे मैडम (कृषि सहाय्यक ) तसेच मंजुलता मैडम (आंगनवाड़ी सेविका ), होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सविता बिजेवार ताई (ग्राम संघ अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली आजची वार्षिक सर्वसाधारण सभा ची बैठक घेण्यात आली. शाहिना मिर्ज़ा ताई यांनी खुप सुंदर शब्दांनी , संचालन केले . पशु सखी ताई आनी कृषि सखी ताई यानी खूप सुंदर अशा शब्दांनी स्वागत गीता ने पाहुण्याचे व सर्व उपस्थिताणचे स्वागत केले… या कार्यक्रमा दरम्यान CLF लेखापाल बबिता ताईनी महीलांना VRF,CIF,अंतर्गत कर्ज वाटप तसेच परतफेडीची कालावधी त्यांचे व्याज दर ,बँक कर्ज च्या माध्यमातुन व्यवसाय करने व इतर व्यवसाय निर्मीतीच्या माध्यमातुन गटातील महीलांना रोजगार देणे बद्दल सुंदर मोलाचे मार्गदर्शन केले. पल्लवी स्वयं सहायता समूह मधील सोफिया आसिफ खान (अध्यक्ष) यानी आपल्या समूहामधील देवान घेवान विषयी संपूर्ण इतिहास रचले. फूंडे मैडम ( कृषि सहायक) यानी बीज प्रक्रिया विषय सविस्तर महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले….तसेच ग्रामसंघाचे लेखापाल नौशीन खाननी नवंबर २०१८ ते मार्च २०२३ पर्यंत चे आढावा सादर केले व तसेच सरपंचसाहेब व ग्रामसेवक साहेब यांच्या हस्ते ग्रामसंघ मार्फत १) के. जी. एन. समूह ६०,००० रू. व २) गैबिशाह समूह ला ६०००० रू. सूक्ष्म गुंतवणूक निधि चा चेक देण्यात आले. clf लेखापाल ताई आणि ग्राम संघ अध्यक्ष ताई यांचा हस्ते ग्राम संघ मार्फत गावातील उत्कृष्ट समूह म्हणून १) पल्लवी समूह २) सत्यम समूह ला बक्षिस वितरण करण्यात आले .संघटनेतुन समृद्धी मोहीम दरम्यान गावात महीलांची रँली काढण्यात आली. आजच्या कार्यक्रमाला ग्रामसंघ पदाधिकारी, बिरसोला प्रभागातील ICRP ताई , कृषी सखी ताई , पशु सखी ताई, व स्वयं समूहातील महीला सदस्य उपस्थित होते… ग्राम पंचायत मध्य महिला सभेत उपस्थित राहून सर्व महिलांनी ग्राम संघ इमारत बांधनी निधि करीता अर्ज सादर केले … या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री- गजभिए साहेब (ग्राम सेवक ) यानी ग्राम संघ मासिक बैठक करिता इमारत बांधनी निधि ग्राम पंचायत चंगेरा मार्फत लवकरात लवकर प्राप्त करून देनार व महिला चे सर्व प्रश्न लवकरात लवकर सुटनार असे मोलाचे मार्गदर्शन करूण अनेक विषयां वर मत मांडले. श्री जाकिर खान सर (युवा संगठन उपाध्यक्ष ) यानी सर्व महिला ना व्यवसाय करून आर्थिक स्वावलंबी बनण्यास, तसेच वेळेवर आलेल्या कामात सहाय्यता करनार अशी महिला ना हिम्मत दिली या प्रकारे यांनी ही मोलचे मार्गदर्शन केले. महिला चे मनोरंजन करिता कबड्डी स्पर्धा ,संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम आणि व्दितीय क्रमांक आले त्यांना ग्राम संघ पदाधिकारी हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या सभेत अल्पोहाराचे सुधा आयोजन केले गेले होते…. शेवटी आज या कार्यक्रमातील अतिथि चे , सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार नूरी खान (पशु व्यवस्थापक ) यांनी केले…..या प्रकारे आज शादी खाना हॉल ,चांगेरा येथे संगम महिला ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खूप चांगल्या प्रकारे पार पडली ….
