साखरीटोला:- (रमेश चुटे) तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्य भारतीय बौध्द महासभा, व नागार्जुन बौद्ध विहार समिती आमगावखुर्द/सालेकसा यांच्या संयुक्त विधमानाने सालेकसा शहरात 7 दिवसीय श्रामनेर श्रामनेरी व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 21 मे पर्यंत चाललेल्या सात दिवसीय शिबिरात भदन्त संघधातू स्थवीर यांनी 22 श्रामनेर, 12 श्रामनेरी, व 7 बोद्धाचार्य यांना प्रशिक्षीत करून दिक्षा दिले.15 मे रोजी सायंकाळी लोकशाहीर संभाजी भगत मुंबई यांचा आंबेडकरी शाहिरी जलसा आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन तालुका बौद्ध महासभाचे अध्यक्ष राजेंद्र बडोले यांच्या अध्यक्षतेखाली कांग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू दोनोंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पूर्ती शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शालिनी बडोले, नागार्जुन बुद्ध विहार समितीचे खेमराज साखरे, राजू जैन, झमाल उके, प्रा. हुसेन चौधरी, प्रा. भूषण राऊत, भिवराम भाष्कर, निर्दोष साखरे, राजेश भाष्कर, युवराज लोणारे, बबलू कटरे, मुकेश मेश्राम, युवराज लोणारे, चेतन भास्कर रमेश करवाडे, प्रमोद कोटंगले, राहुल वाघमारे, अश्विन जनबंधू, संगीता भोवते उपस्थित होते. सात दिवसीय श्रामनेर शिबिर पूर्ती पब्लिक शाळा परिसरात घेण्यात आले होते. 20 मे रोजी सकाळी श्रामनेर, श्रामनेरी, व बोद्धाचार्य यांची नगरभ्रमन रैली काढण्यात आले होते दरम्यान जागोजागी नगरवाशियानी स्वागत केले मधुकर हरिनखेडे व सुनील असाटी यांनी शरबत वाटप केले. सात दिवसीय शिबाराचे सुञसंचान निर्दोष साखरे यांनी तर उपस्थिताचे आभार भूषण राऊत यांनी मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भारतीय बौध्द महासभा, व नागार्जुन बौद्ध विहार समिती सालेकसा येथील पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले.
