देवरीः- (कैन्हया श्रीसागर) शिलापुर येथील रेती घाटावर अवैध रेती वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. तर दुसरी कडे रात्रीच्या सुमारास शिलापुर – पुराडा – फुक्कीमेटा मार्गे दुसर्या जिल्हातून – राज्यातून अवैध रेती वाहतुकीमुळे होणा-या त्रासामुळे गावातील नागरिक त्रस्त असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून सक्षम अधिका-यांकडून मात्र याकडे डोळझाक होत आहे.रात्रीच्या सुमारास पुराडा – शिलापुर – फुक्कीमेटा गावातील मुख्य रस्त्यावरुन होणा-या अवैध वाहतुकीमुळे या गावातील नागरिकांना गाड्यांचा कर्कश आवाजाचा त्रास होत असुन त्यांची झोप व्यवस्थीत होत नाही. तरी सक्षम अधिका-याने या कडे लक्ष घालून अवैध रेती वाहतुकीला आळा घालावा व पुराडा – शिलापुर – फुक्कीमेटा या गावातुन रात्री- दिवसा दरम्यान होत असलेल्या अवैध रेती वाहतूकीला आळा घालावा अन्यथा गावातील नागरिक तथा सामाजीक क्षेत्रात कार्य करनारे पक्ष रस्त्यावर उतरुन नेहमीसाठीच रेती वाहतुक बंद पाडतील, असा इशारा या गावातील नागरीकानीं दिला आहे.




