देवरीः- (कैन्हया क्षीरसागर) फुक्कीमेटा गावातील कु.भाग्यलक्ष्मी शिवचंद मोहबे हीने बाबुराव मडावी विद्यालय देवरी येथे शिक्षण घेऊन १० वीच्या बोर्डाचा परिक्षेत ८७.४० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी ही भरपुर पुढे जावु शकतात.त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असुन गावातील वार्तावरण तयार करणे महत्वाचे आहे.तिला प्रेरणा मिळावी म्हणुन तिच्या यशासाठी भाग्यलक्ष्मी व पालकाचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक बुराडे सर , पटले सर , चकाट्रे सर , व ग्रा.प फुक्कीमेटा चे सदस्य दुलीचंद धानगुन आणि संतोष बहेकार , मुलचंद मोहबे, शिवचंद मोहबे , हेमेंद्र मोहबे यानी तीला योग्य मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्या दिल्या.
Author: Elgar Live News
Post Views: 327