सालेकसाः- (सुरेंद्र खोब्रागडे) सालेकसा तालुक्यातील ग्राम खेडेपार- कुंभारटोला येथील अंबरलाल लिल्हारे यांच्या गोठ्याला गावातील विरोधक लेखराम झगडुलाल डहारे यांनी रात्री आग लावल्यामुळे गोठा पुर्णत: जळुन राख झाला. बरे झाले की त्यावेळेस गोठ्यात गुरे बांधले नव्हते. अन्यथा शेतक-यावर उपासमारीची पाळी आली असती.
तरिही अंबरलाल लिल्हारे यांचे एक लाख रूपयाचे नुकसान झाले असुन ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला गुरे ढोरे बांधण्याची समस्या निर्माण झाली आहे.
गोठा जळाल्याची माहिती प्राप्त होताच जि.प.सद्स्या छायाताई नागपुरे यांनी घटनास्थळी भेट देवुन पिडीत अंबरलाल लिल्हारे यांची भेट घेतली तसेच घटनास्थळावरून तहसीलदार सालेकसा यांना भ्रमणध्वनी वरून सदर कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची विनंती केली तेव्हा तलाठी स्मिता बारसे यांनी तात्काळ येऊन नुकसानीचा पंचनामा केला.
यावेळी शंकरलाल नागपुरे,मयाराम डहारे,नेतराम डहारे,अमित अग्रवाल,बलीराम डहारे,शामलाल लिल्हारे,झाडुलाल लिल्हारे,मुन्नेलाल डहारे,विजय सिहोरे,सुरेन्द्रकुमार खोब्रागडे व इतर गावकरी उपस्थित होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: आग लावल्यामुळे गोठा जळुन शेतकरीचे लाखाचे नुकसान, ID: 28519
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: आग लावल्यामुळे गोठा जळुन शेतकरीचे लाखाचे नुकसान, ID: 28519
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]