देवरीः- ग्रामपंचायत भर्रेगाव मध्ये सा.बा.विभाग मार्फत नाली बांधकाम मंजुर झाले असुन त्या कामाची माहीती ग्रा.पं.कार्यालयातील संरपच व पदाधिकारी यांना कोणत्याच प्रकारे माहीती न देता मौजा भर्रेगाव येथे स्वमर्जीने नाली बांधकाम सुरु केले.शासनाच्या ईस्टीमेट नुसार नाली बांधकाम करीत असतांनी खालती कोणत्याही प्रकारे मासकाग्रेट न टाकता नाली ही समांतर भागात न करता ओबळ-धोबड केल्यामुळे आरोग्य केंद्राजवळ पाणि साचल्यामुळे गरोदर महीलांना जाण्यासाठी त्रास होण्याची शक्यता आहे. साथीचे रोग,डेगु मलेरिया,होण्याची शक्यता ना-कारता येत नाही. ्ग्रामपंचायत कमेटी व गावकरी च्या म्हण्यानुसार नालीबांधकाम कंत्राटदारावर कार्यवाही करुन त्याचे बिल थांबविण्यात यावे.अन्यथा मा.कार्यकारी अधिकारी जबाबदार राहतील.लोकांना शंका आहे की अधिकारी संगनमताने बिल काढुन झाले तर नाही असे जनतेचे प्रश्न आहे.




