देवरी – दि.०८/०८/२०२३ ला देवरी तालुक्यातील तालुकाध्यक्ष व कार्यकारणी उपस्थित होते.तिरोडा पंचायत समिती ग्रामपंचायत मांडवी येथील श्री- तुरेंद्र भोजलाल नागपुरे, vle हे १२ वर्षा पासुन अगदी प्रमाणिकपणे निरंतर आपले काम पुर्ण करित आहे. तुरेंद्र भोजलाल नागपुरे सन २०२२-२३ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंच या पदावर निवडुण आले आहेत.त्यांनी ०२/०१/२०२३ ला शासनाकडे पत्र सादर केले आहे की, मी संरपच मानधन शासनाकडुन घेणार नाही व फक्त VLE या कामाचा जो मिळणार आहे त्यावर उदरनिर्वाह करणार आहे. श्री- तुरेंद्र भोजलाल नागपुरे, VLE ग्रामपंचायत मांडवी पंचायत समिती तिरोडा,जिल्हा परिषद गोंदिया यांना कोणतीही पुर्व सुचना न देता तात्काळ कामावरुन कमी करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री- खामकर साहेब व जिल्हा व्यवस्थापक श्री- मनिषकुमार वर्मा साहेब यांच्या शी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की राजकीय दबावामध्ये येवुन श्री- तुरेंद्र भोजलाल नागपुरे, VLE यांची सुनावणी न घेता शासन निर्णय आसक – २०१७/प्र.क्र./९२ ASSK २५/०३/२०२२ शासन निर्णायाची अवहेलना करुन संबधित VLE वर अन्याय -अत्याचार करुन त्यांना कामावरुन कमी केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री- खामकर साहेब यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (फ) मध्ये सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत नमुना २४ वर नोंदणी करुन द्यावी आम्ही आताच सरपंच पद सोडण्यास तयार आहोत असे संघटनेचे म्हणणे आहे. देवरी तालुक्याने सुध्दा सदर नविदेन गटविकास अधिकारी साहेब यांना दिले.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना देवरी तालुक्याने अन्यायाच्या विरोधात कामबंद आंदोलन पुकारले, ID: 28729
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना देवरी तालुक्याने अन्यायाच्या विरोधात कामबंद आंदोलन पुकारले, ID: 28729
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]