कन्हैया क्षीरसागरः- फुक्किमेटा/देवरी तालुक्यातील छत्तीसगड सीमा लागत असलेले रस्ते कंपनीच्या कारभाराने डांबरीकरण खाल तर गिट्टी वर आली असून सदर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
वृत्त असे की अग्रवाल ग्लोबल कंपनीचा काम मरामजोबघाट ते शिरपूर या मार्गावर उडानपुल चे काम सुरू आहे. या कामाला लागणारे कच्चामाल पुराडा येथील ऐका शेतकऱ्याच्या शेतामधून कच्चा माल काढून पुराडा- ढीवरीनटोला- फुक्किमेटा – मकरधोकडा- चंदीटोला असे या मार्गाने कंपनीचे टिप्पर वाहतूक करत आहे.या वाहतुकीमुळे सदर रस्त्यांची डांबरीकरण खाल व गिट्टी वर आली आहे. इथुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावा लागत असून पायी चालनाऱ्याना सुद्धा धडपायदळ चालता येत नाही. या रस्त्यावरून वाहतूक करणारे प्रवासी कित्येकदा जखमी सुद्धा झालेले आहेत. तरीसुद्धा अग्रवाल ग्लोबल कंपनी आपल्या मनमर्जी पणाने याकडे दुर्लक्ष करीत असून आपले काम पूर्ण करून घेत आहे. या रस्त्याच्या मार्गावर ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून कंपनी बुजवित सुद्धा नाही आहे जर एखादी दुर्घटना किंवा जानहानी झाली तेव्हा कंपनीला जाग येणार काय व त्याचा जवाबदार कोण असा प्रवासाच्या मनामध्ये प्रश्न पडला जर सदर रस्ता दुरुस्ती केली नाही तर आम्हाला रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी, प्रवाशांनी केला आहे.




