????ग्रामपंचायत सातगावच्या वतीने ढोल तासाच्या गजरात शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियानात सहभाग!
साखरीटोला-: (रमेश चुटे) भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत असतानाच त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या मेरी माटी, मेरा देश या अभियानाच्या माध्यमातून 25 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सातगाव/साखरीटोला प.स. सालेकसाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव उपक्रमातर्गत मेरी माती मेरी देश मधे अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावकऱ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अमृत कलश यात्रेची सुरुवात ग्रामपंचायत भवनातून करण्यात आले. यावेळी प.स.सालेकसाचे उपसभापती संतोष बोहरे, सरपंच नरेश कावरे, उपसरपंच सौ. अफरोजताई पठाण, ग्रां.प. सदस्य सौ. सुषमाताई काळे कु. सुमनताई ठाकरे, सौ. श्वेताताई अग्रवाल, एस. आर.मेश्राम मुख्याध्यापक जि.प. हायस्कूल सौ. अजयाताई चुटे मुख्याध्यापिका श्री विद्या गर्ल्स हायस्कूल साकरीटोला, नारायण काळे अध्यक्ष तंमुस सातगाव, ओ. के. रहांगडाले ग्रामसेवक, सर्व शिक्षक, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक, आंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी, विद्यार्थी उपस्थीत होते. अभियानांतर्गत संपूर्ण गावात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यामध्ये प्रत्येक घरून 01 मूठ माती गोळा करून अमृत कलश मध्ये गोळा करण्यात आले. सदर कार्यक्रम ढोल ताशांच्या आवाजात काढण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मेरा देश मेरा घर, मेरी माती मेरा देश, माटी को नमन विरोंको वंदन, मेरी माती मेरा देश, यही है एकता का संदेश, भारत माता की जय असा जयघोष करण्यात आले.







