फुक्किमेटा/देवरी:(कन्हैया क्षिरसागर) दि.६ ला वनविभाग मार्फत ग्रा.प.फुक्कीमेटा येथे जि.प.प्रा.शाळा येथील मुलांची रैली काढून गावामध्ये नागरिकांना जागृत करून वन्यजीव सप्ताह वन विभाग मार्फत साजरा करण्यात आला. सप्ताह निमित्त ग्राम पंचायत फुक्किमेटा येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाध्ये वनविभाग मार्फत वन्यजीव यांचे महत्व सांगण्यात आले.वन्यजीव सप्ताह निमित्त घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. सुलोचनाताई सरोते सरपंच ग्रा.पं.फुक्कीमेटा तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.चिंतामणी जी गंगाबोईर उपसरपंच ग्रा.पं.फुक्कीमेटा,मा.संतोषजी ब्राह्मणकर अध्यक्ष शा व्ये.स. तसेच सर्व सदस्य ग्रा.पं. फुक्कीमेटा,मा.उदापूरे,मा.राऊत,थेर,पटले वनरक्षक व शाळेतील सर्व शिक्षक, तसेच गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



