- साखरीटोला-: (रमेश चुटे) सालेकसा तालुक्यातील कडोतीटोला येथे रायल किंग क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित चार दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे शुभारंभ दिनांक 20 नोव्हेंबर रोजी कडोतीटोला ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.आम्रपाली कोटांगले यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. सदस्य सौ.वंदनाताई राजु काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य वीणाताई कटरे, डॉ.संजय देशमुख, भाजप आदिवासी आघाडीचे तालुका सचिव चंद्रसेन मरकाम, ग्रामपंचायत उपसरपंच किसन मरकाम, कुसोबा बडोले ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील भीमराजसाखरे, पवन बाहेकार ग्रामपंचायत सदस्य, युवराज पंधरे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक 8,888/रुपये रोख तर द्वितीय पारितोषिक 4,444/ रुपये रोख आयोजन समिती कडून देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे हेट्रिक चौकार, हेट्रिक षटकार, हेट्रिक विकेट, मेन आफ द मॅच मॅन आफ द सिरीज पुरस्कार देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष डाँ. संजय कोरे, उपाध्यक्ष अश्विन नंदेश्वर, राहुल मरकाम, शुभम बहेकार, राहुल बागडे, कुशीद्र ठाकरे, युवराज पंधरे, अनिल नंदेश्वर, डीलेश्वर बहेकार, अर्जुन विक्की, संतोष टेकाम, हर्षित मेंढे, पराग शहारे, निलेश बहेकार, अनिश येटरे, अमन शहारे, अथर्व कोटांगले, राजेश बागडे, मंगेश मेंढे, हिमांशू बडोले, गुड्डु मेंढे, उमेंद्र शहारे, आदित्य फुंडे, ऋषिकेश शहारे, प्रिन्स साखरे, संजय सयाम, दीपक बहेकार, शिवशँकर शिवणकर, यांनी ग्राउंडवर उल्लेखनीय व्यवस्था केले होते. व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासात अभ्यासाला महत्त्व आहेच, तितकेच महत्त्व मैदानी खेळालादेखील आहे. खेळामुळे मन आणि शरीर दोन्ही चांगले राहते. असे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डाँ. संजय कोरे यांनी तर उपस्थित पाहुण्याचे आभार डिलेश बहेकार यांनी मानले.
Author: Elgar Live News
Post Views: 103