गोंदियाः- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेने (दि.२८/११/२०२३ रोज मंगळवार) ला जिल्हा परिषद कार्यालयासमोर भर पाऊसात एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.सरकारला मागील ५ वर्षापासुन मागणी करीत असुन आता पर्यंत सरकार व प्रशासनाच्या अधिकारी यांनी आम्हाला फक्त आश्वासन देवुन तुमच्या मागण्या पुर्ण करुन देण्याची हमी देतो आहोत. तुम्ही काम सुरु करा त्यांच्या शब्दाचा मान ठेवुन आम्ही काम सुरु करित होतो.आम्हाला प्रत्येक विधानसभेच्या मोर्च्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या मंत्री मोहद्याचे पत्र मिळत असे त्यांच्यावर समाधान मानुन काम चालु करत होतो.पण आम्हाला शासनाकडुन आज पर्यंत कोणत्याही प्रकारची मागणी पुर्ण न झाल्यामुळे आम्हाला आंदोलन करावा लागत आहे. १) राज्यातील ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या सुधारित आकृतीबंधात समावेश करुन दर महिण्याच्या निश्चित तारखेस वेतन देणे. २) आकृतीबंधात समाविष्ट कऱण्यास कालावधी लागत असल्यास दर महीण्याच्या निश्चित तारखेस प्रतिमाह २०,०००/- रुपये वेतन देणे. ३) नियमबाह्य कामे लावताना ग्रामविकास विभागाची पुर्व परवानगी घेवुन कामे देणे व त्याच्या मोबदला देणे. ४) सद्यस्थितीत असलेले कामाचे टार्गेट सिस्टिम पुर्णतः बंद करणे. ५) मागील सर्व थकीत वेतन देणे. वरील मागण्या जो पर्यंत सरकार व प्रशासन मान्य करित नाही तो पर्यंत आम्ही काम बंद ठेवु ही लढाई शेवटचीच आहे. अशी आमची भुमिका आहे.
जिल्हाअध्यक्ष – जितेंद्र साखरे,जिल्हा उपाध्यक्ष – टोलीराम नेरकर,जिल्हा सचिव- प्रमोद गौतम व सर्व तालुकाध्यक्ष व संपुर्ण संगणक परिचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.