कळस यात्रा व जय श्रीरामच्या जायघोषाने दुमदुम सालेकसा नगर
साखरीटोला-: (रमेश चुटे) अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माणकार्य जवळपास पुर्णत्वास आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीरामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून नुकतेच ‘अक्षता कलश’ वितरीत करण्यात आले. देशभरातील 5 लाख गावांमध्ये या पूजित अक्षता कलशांचे वितरण करण्यात येत आहे. त्यापैकी एका कलशाचे आगमन सोमवार, दि. 25 डिसेम्बर रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यालय सालेकसा येथे झाले आहे. कार्यालयात आलेल्या कलशाचे प. पु. संत ज्ञानीदास महाराज तिरखेडी आश्रम यांच्या प्रमुख उपस्थित विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सह मंत्री, देवेश मिश्रा, विहिपचे जिल्हा सेवा प्रमुख वसंत ठाकूर, विहिपचे जिल्हा सह मंत्री मुकेश उपराडे, तालुका अध्यक्ष अभियान प्रमुख बद्रीप्रसाद दशरिया, विनोद जैन, सन्नी नशिने, हरिष नागपुरे, कन्हयालाल लिल्हारे, वैभव पटले, संजू उईके, प्रल्हाद वाढई, गुमानसिंग उपराडे, रेणू जोशी, कविता येटरे, शिवकुमार लिल्हारे, ईश्वर मच्छीरके, अभय वाढई, कवल दशरीया, शंकर मडावी, शिवकुमार बल्हारे, गोपाल पांडे, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे आणि शैकडो संख्येने रामभक्तांनी स्वागत व पूजन केले. दरम्यान बजरंग दल कार्यालयापासून सदर अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आले. “जय श्रीराम”, ” सियावर रामचंद्र की जय” च्या प्रचंड जयघोषात ढोल ताशाच्या गजरात यात्रा काढून अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे अक्षता देऊन निमंत्रण देण्यात आले. भव्य कळस यात्रेने सालेकसा नगर दुमदुमले होते. याप्रसंगी स्थानिक हनुमान मंदिरात पूजन अर्चन करण्यात आले. 200 माहिलांनी कळस यात्रेसाठी स्वयंस्फूर्त पुढाकार घेतला होता.
22 रोजी जवळच्या मंदिरात आनंदोत्सव साजरा करा
इच्छा असून सुद्धा प्रत्येक भाविक अयोध्याला जाऊ शकत नाही गावातील आनंदोत्सव साजरा अशी करण्यात आले
यावेळी “प्रत्येक श्रीराम भक्ताच्या घरी जाऊन पूजलेल्या अक्षता, प्रभू श्रीरामांचे छायाचित्र आणि जवळच्या किंवा गावातील मंदिरातील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची योजना आखण्यात आले होते. 22 जानेवारी रोजी सर्व रामभक्तांनी आपल्या राहत्या ठिकाणच्या मंदिरात सकाळी 11ते 1 या कालावधीत भजन, कीर्तन, नामजप करून आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन विहिंपकडून करण्यात आले आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: अयोध्येतील 'अक्षता कलशा'चे सालेकसा येथे आगमन!, ID: 29325
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: अयोध्येतील 'अक्षता कलशा'चे सालेकसा येथे आगमन!, ID: 29325
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]