इतर वकिलांनी घेतला धसका
Elgarlivenews
(सुरेन्द्र खोब्रागडे उपसंपादक आमगांव) आज दि.5 फेब्रुवारी2024 रोज सोमवार ला जिल्हा न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात न्यायधीश अभिजीत कुलकर्णी व जेष्ठ वकील पराग तिवारी या दोघांत शाब्दिक वाद झाला यावर न्यायाधिशांनी न्यायालयाचे अवमान झाल्याचे सांगुन ॲड.पराग तिवारी यांना 90 रूपये दंड किंवा दंड न भरल्यास 10 दिवसाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली त्यामुळे न्यायालयात स्मशान शांतता पसरली.
ॲडव्होकेट पराग तिवारी यांचा एक प्रकरण मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष असतांना ते न्यायालयात उशीरा गेल्याने न्यायधीश अभिजीत कुलकर्णी यांनी थेट पक्षकाराला वकील बदलविण्याचा सल्ला दिला यावर पराग तिवारी यांनी आक्षेप घेतला यावरून न्यायधीश अभिजीत कुलकर्णी व ॲड.पराग तिवारी यांच्यात शाब्दिक वाद झाला यावर न्यायधीश अभिजीत कुलकर्णी यांनी कोर्टाचा अवमान केल्याचे कारण सांगुन पराग तिवारी यांना 90 रूपये दंड किंवा 10 दिवसाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
यामुळे व्यथित झालेले बार असोसिएशनचे माजी.अध्यक्ष जेष्ठ वकिल पराग तिवारी यांनी चुक नसताना दंड भरणार नाही अशी ताठर भूमीका घेतल्याने गोंदिया पोलीसांनी ॲड. तिवारी यांना ताब्यात घेवुन त्यांची भंडारा येथील कारागृहात रवानगी केली.
याप्रकरणावरून जिल्ह्यातील प्रत्येक वकील धास्तावलेले असल्याचे दिसून आले.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)