आमगांवः- (दि. ०७/०२/२०२४) ला त्यागमूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती सिद्धार्थ बुद्ध विहार रिसामा (बिरसी रोड) येथे रमाबाई यांचे त्याग व बाबासाहेबांना अत्यंत बिकट परिस्थितीत साथ देवुन सहकार्य केले म्हणुन बाबासाहेबांनी संपुर्ण भारतातील वंचितासाठी कायदे केले. आपल्या मुलाचे बलिदान रमाई ने दिले पण बाबासाहेबांना त्यांनी घरी बोलावले नाही.एवढे त्याग रमाई ने केले. आपण नाचण्यात व चुकीच्या कामात आपला वेळ घालवितो. भीम गीतावर व रमाई गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन बहुजनाच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे प्रमुख मा. आनंदजी बंसोड हे होते तसेच मा. रामेश्वरजी श्यामकुवर सामाजिक कार्यकर्ता, मा.पुरुषोत्तमजी वासनिक व रमाई नगर वार्डातील समस्त बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 96