साखरीटोला/सालेकसा-:-(रमेश चुटे)
पंचायत समिती सदस्या सौ.अर्चनाताई अंबरलाल मडावी यांच्या वतीने सालेकसा येथील प्रगती कॉलोनी मधे आज 27 फेब्रुवारी रोजी श्री वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा दिवस कार्यक्रमाची अध्यक्षता सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर बारसे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामदेव मिसाळ, सौ.अंजीराबाई मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण आमगावचें अंबरलाल मडावी, राजू पंधरे पोलीस शिपाई, पवन पगरवार पोलीस शिपाई, सरस्वताबाई चूटे, सुनीताताई सहारे, आशाताई मिसाळ, दिपालीताई बारसे, पूर्वी पगरवार, उषाताई येकुळकर, संगीताताई पंधरे, सोनालीताई एकुलकर, आचल चींदालोरे, अश्विनी वडगाये, कृती दीहारी, खुशी एकुळकर आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्राचें पूजन, दीपप्रज्वलन व माल्याअर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्र गीताने करण्यात आले.
