Published:

गडचिरोली/चिमूर लोकसभेसाठी भाजपकडून खा. अशोक नेते यांचा उम्मेदवारी अर्ज दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ना. सुधीर मुनगंटीवार, ना.धर्मरावबाबा आत्राम, सह हजारोच्या संखेत भाजप व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.

गडचिरोली/गोंदिया-: (रमेश चुटे) गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते यांनी मंगळवार 26 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल अर्ज दाखल केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ. डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.बंटी भांगडिया, माजी आमदार अतुल देशकर, माजी राज्यमंत्री अमरीषराव आत्राम, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार केशव मानकर माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवनकर, भंडारा गोंदियाचे संघटन महामंत्री विरेन्द्र अंजनकर, जि.प महिला बाल कल्याण सभापती सविताताई पुराम, भाजपचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष ऍड. येसूलाल उपराडे, व महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. खा. नेते यांच्या निवासस्थानावरून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्हा भाजपचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, गोंदिया जिल्हा भाजपचे अध्यक्ष ॲड.येशूलाल उपराडे, जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदाताई कोडवते, डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. शामजी हटवादे, संजय गजपुरे, भारत खटी, प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, गोविंद सारडा, योगिता पिपरे, किसान आघाडीचे रमेश भूरसे, जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, आशिष पिपरे, अरूण हरडे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, लोकसभा निवडणुक प्रमुख किशन नागदेवे यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी गडचिरोली/चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्वात लांब दुरीवर असलेल्या आमगाव विधानसभा क्षेत्रातील आमगाव, देवरी, व सालेकसा तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उम्मेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाप्रसंगी गडचिरोलीला पोहोचले होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: गडचिरोली/चिमूर लोकसभेसाठी भाजपकडून खा. अशोक नेते यांचा उम्मेदवारी अर्ज दाखल, ID: 29746

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर