सिरपुरबांधः- सिरपुरबांध येथे आंतरराज्यीय सिमा तपासणी नाका आहे.सिमा तपासणी नाका हा ट्रकांच्या संपुर्ण डाक्युमेंट तपासणी करणे, अयोग्य मालाची वाहतुक होवु नये व ओव्हरलोड ट्रक जावु नये यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च करुन ह्याठिकाणी आंतरराज्यीय सिमा तपासणी नाका तयार केलेला आहे. सिमा तपासणी नाक्याच्या अगोदर ओव्हलोड गाड्या खाली करुन दिवसाला मालवाहतुक ट्रक अंडरलोड करुन सिमातपासणी नाक्यावरुन जातात पण त्यांच्या वर पोलिस यंत्रणा कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्यामुळे गावातील लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. गरीबाने थोडी चुक केली की लगेच यत्रणा सांविधानिक कार्यवाही करण्यासाठी सज्ज होते.मग यांच्यावर कार्यवाही का नाही असे मत गावातील नागरिकांचे आहे.




