????लोकप्रतिनिधीच्या कमिशनखोरीमुळे रस्ता बांधकामाचा दर्जा घसरला पिपरियाचे उपसरपंच गुणाराम मेहर यांचा आरोप
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे) मागील दोन वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सालेकसा तालुक्यातील पिपरिया ते चिंचटोला हा तीन किलोमीटरचा डांबरी रस्ता बनलेला आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या कमिशनखोरीमुळे रस्ता बांधकामाचा दर्जा घसरला असून जागोजागी खड्डे पडले आहे. मध्यप्रदेश व छ्तीसगड राज्याला जोडणाऱ्या आदिवासी बहुल पिपरिया क्षेत्रातील लोकप्रतिनिधीसह प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. सर्व सामान्य नागरिकांसोबतच शालेय विद्यार्थ्यांची या रस्त्याने मोठी वर्दळ असते. त्यात भरधाव वेगाने येणारे वाहनांमुळे छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे त्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. व परिसरातील लोकांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून त्या रस्त्याने स्थानिक लोकप्रतिनिधी नेहमी ये-जा करत आहेत परंतु कमिशनखोर वृत्तीमुळे मोठ मोठे खड्डे पडले असून सुद्धा त्यांनी डोळे बंद केले असल्याचा आरोप येथील उप-सरपंच गुणाराम मेहर यांनी केला आहे. उपसरपंच गुणाराम मेहर यांनी रस्ता संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधले असता अधिकाऱ्यांनी सदर रस्ता मेंटेनन्स वर असल्याने रस्ता दुरुस्त झाल्याशिवाय सदर कंत्राटदाराला त्याची देयके देणार नाही असे सांगितले. पण त्यापूर्वी जर मोठी जीवहानी झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपसरपंच मेहर यांनी निर्माण केला आहे. कारण मध्यप्रदेश छत्तीसगढ राज्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असून येथून नेहमी रात्रंदिवस छोटया मोठया वाहनाची वर्दळ असते. तरी सबंधित विभागाने त्वरित मेंटेनन्स मधून रस्ता दुरुस्त घ्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: सालेकसा तालुक्यातील पिपरिया ते चिंचटोला रस्ता ठरतोय जीवघेणा, ID: 29914
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: सालेकसा तालुक्यातील पिपरिया ते चिंचटोला रस्ता ठरतोय जीवघेणा, ID: 29914
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]