सिरपुरबांधः- ग्रामपंचायत शिरपूर बांध येथील सर्व नागरिक येऊन 133 वी भीम जयंती साजरी करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजातील जे वंचित ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हतं ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हतं ते बहुजनांना मिळवून दिल.संपुर्ण भारत देश ज्याच्यावर चालतो असे संविधान निर्माते यांची संपूर्ण भारतात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. वंदना डोंगरे यांनी मार्गदर्शन करतांनी जर भारतात ओबीसी ची जनगन्ना झाली तर ह्या देशातील सत्ताधारी व शासन कर्ता समाज ओबीसी राहील.पण या देशात ओबीसी ची जनगन्ना का करीत नाही यांचा अभ्यास ओबीसी प्रवर्गाने करावे असे संबोधन केले. कार्यक्रमाला उपस्थित गावचे सरपंच नितेश भेंडारकर गावचे पोलीस पाटील नरेश शिवणकर गावचे प्रतिष्ठित नागरिक फुलचंद फुंडे गावचे प्रतिष्ठित नागरिक रोशन मेश्राम कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित भारत मुक्ती मोर्चा अध्यक्ष वंदना डोंगरे करुणा नंदागवळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित किरण रामटेके राजू बनसोड हे उपस्थित होते ,सुत्रसंचालन मुकुल मेश्राम यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैभव बोरकर यांनी केले. गावातील युवकांनी भरपूर मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केला.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)