इंटरनेट च्या वाईट साईड मुळे अल्पवयीन मुलांत एवढ्या मोठ्या घटनेला अंजाम देवरी : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत महेताखेडा मौजा – गोठानपार लग्न समारंभात आलेल्या 12 वर्षीय मुलीचा अपहरण करून हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी कुठलेही सबळ पुरावे नसताना मोठ्या शिताफीने या घटनेचा तपास करून चार विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून हे चारही विधिसंघर्ष बालक देवरी तालुक्याच्या चिल्हाटी गावातील रहिवासी आहेत. १९ एप्रिल ला पीडित मुलगी आपल्या बहिणी सोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठाणपार गावात लग्न समारंभात आली होती. पीडित मुलीच्या मित्राने तिला आपल्या दुचाकीवर बसवून वडेकसा जंगलात घेऊन गेला. तिथे असलेल्या 4 मित्रांनी पीडितेवर जंगलात सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करीत हत्या करत पळ काढला. २० एप्रिल ला सकाळी पीडितेच्या शोध घेतला असता गावकऱ्यांना पीडित मुलीचा मृतदेह जंगलात आढळला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मात्र, सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात अडचण निर्माण होत असल्याने पोलिसांनी ६ विविध पथके तयार करून या संदर्भात तपास केला असता पीडितेच्या मोबाईल वरून काही मुलांशी चॅटींग समजून आल्याने आणि हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसानी तपास चक्रे फिरवीत 4 विधिसंघर्ष मुलांना ताब्यात घेत चौकशी केली असता 2 मुलांने गुन्हा कबुल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कलम 302, 376, 363, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या चारही विधिसंघर्ष बालकांची रवानगी नागपुर येथील बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. सदर माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील पत्रकार परिषदेत नित्यानंद झा (अप्पर पोलीस अधीक्षक) यांनी माध्यमांना दिली.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: अल्पवयीन मुलांनेच केले दुष्यकृत्य हा दोषकुणामुळे यांचे संसोधनाची गरज, ID: 29992
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: अल्पवयीन मुलांनेच केले दुष्यकृत्य हा दोषकुणामुळे यांचे संसोधनाची गरज, ID: 29992
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]