हेल्पिंग बाईज ग्रुप देवरी ने विद्युत विभागाला पाच दिवसाचा दिला वेळ अन्यथा देवरीवासी नेणार विद्युत विभागावर मोर्चा देवरीः-( दि.०२/०५/२०२४) देवरी शहरात कमी होल्टेज मुळे देवरी येथील रहीवाशी,व्यवसायिकांना विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे त्यांच्या व्यापारावर मोठ्याप्रमाणात नुकशान होत आहे.आज घडीला ४४ अंशाच्या वर पारा चढला आहे. घरातील पंखे.कुलर,मोटार,लाईट हे सर्व खराब होत आहेत.कधी जास्त होल्टेज झाल्यामुळे सुध्दा घरातील विद्युत यंत्र खराब झालेले आहेत.विद्युत विभाग देवरीवासियांची समस्या लक्षात घेईल पण प्रत्यक्षात दुर्लक्ष केल्यामुळे हेल्पिंग बाईज ग्रुपच्या सदस्यांनाच दि.०२ ला विद्युत विभागाला निवेदन देण्यात आले.निवेदनात सर्व समस्या सविस्तर सांगितल्या आहेत. देवरी येथिल रहीवाशी व व्यवसायिकांना विद्युत पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी शेतकरी वर्गाचा प्राब्लम नसुन देवरी येथील एमआयडीसी देवरी येथील कंपनीला विद्युत जात आहे.त्यामुळे प्राब्लम आहे.तेथील विज तात्काळ थांबवुन देवरीवासियांना सुरळीत विद्युत पुरवठा करावा अशी मागणी केलेली आहे. विद्युत व्यस्थित न झाल्यास कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा जाणार हेल्पिंग ग्रुप संघटनेने इशारा दिला आहे.हेल्पिंग ग्रुपचे पदाधिकारी इलियाज कुरेशी,सचिन भांडारकर,सोनगिरी चव्हान,राजा खान,नवल भाटीया,राकेश निनावे,राजा भाटीया,विकी,मोशन अंन्सारी,प्रमोद गुप्ता,सोहेल सय्यद,हेमंत ताराम,सत्यनारायण अग्रवाल,करण भाटीया,जय साखरे,दिपक लांजेवार यांनी महावितरण कार्यालय देवरी येथील कार्यकारी अभियंताला निवेदन दिले.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे देवरीवासी उन्ह्याळ्यात बेजार, ID: 30002
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे देवरीवासी उन्ह्याळ्यात बेजार, ID: 30002
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]