Published:

शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हा स्पर्धा परीक्षांचा यशस्वी पाया- गजेंद्र फुंडे

🔹सुकन्या विद्यालय काटी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी 75 विध्यार्थाचे सत्कार

🔹राष्ट्रीय दुर्बल घटक परीक्षेत यशस्वी विध्यार्थिनी कु. वंशिका भगत व तिच्या आईवडिलांचे सत्कार
साखरीटोला/गोंदिया (रमेश चुटे)
शाळांमधून होणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच एमटीएस, केटीएससारख्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला विकसित करत असतात. त्यामुळे या परीक्षाच पुढच्या काळात स्पर्धा परीक्षांचा पाया पक्का बनवतात, असे प्रतिपादन सुकन्या संकल्प निकेतन विद्यालय काटी/गोंदियाचे संचालक गजेंद्रभाऊ फुंडे यांनी केले. काटी येथील सुकन्या संकल्प विद्यालयात सोमवार 20 मे रोजी पाचवी व आठवी वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने सन 2023-24 या सत्रात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुकन्या विद्यालयातील वर्ग आठवीच्या 66 विध्यार्थ्यानी भाग घेतले होते त्यात 61 विध्यार्थी यशस्वी झाले. तर वर्ग पाचवीचे 20 विध्यार्थी परीक्षेत बसले होते त्यात 14 विध्यार्थ्यानी यश संपादन केले. असे 75 विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. दरम्यान राष्ट्रीय दुर्बल घटक परीक्षेत यशस्वी विध्यार्थिनी कु. वंशिका भगत आणि तिच्या आई वडिलांचे सुद्धा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता काटी जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या कु.आनंदाताई वाढ़ीवा यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्या जितेश्वरीताई रहांगडाले, ग्रामपंचायत कासाच्या सरपंच उमेश्वरी संतोष चौधरी, ग्रामपंचायत बिरसोलाच्या सरपंच सरोजनी दांदरे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष टिमेंद्र तुरकर, सदस्य सुरेंद्र असाटी, भद्याटोलाचे पोलीस पाटिल मुकेश पाचे, हन्नुलाल दादरे, विद्यालयाचे संचालक गजेंद्र फुंडे, सौ. मंजूषा फुंडे, प्राचार्य डी. एस. बहेकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विधेची देवी शारदा यांच्या चित्रा समक्ष दीपप्रज्वलन, पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. याप्रसंगी पाहुण्यानी आपले विचार मांडले व सुकन्या विद्यालयातील विध्यार्थी शिक्षणासह, क्रीडा, सामान्य ज्ञान, विज्ञान स्पर्धा, टापटीपपणा, अश्या विविध विषयात अग्रगण्य असल्याचे मत व्यक्त केले.शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रशस्ति व पत्र गुणपत्रिका प्रदान करून सत्कार करण्यात आले. सन 2019- 20 मधे 48 विध्यार्थी, 2021- 22 मधे 30 विध्यार्थी, 2022- 23 मधे 30 विध्यार्थी, आणि सन 2023- 24 मधे 75 विद्यार्थी, या शाळेतून शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले हे उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे ए.एम. सेलुकर, राहंगडाले, बोपचे, सुजीत मेश्राम, जी.बी. पडोले, एस. डब्लू. राऊत, दिघोरे मैडम, कावड़े, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संदेश पवार यांनी मानले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हा स्पर्धा परीक्षांचा यशस्वी पाया- गजेंद्र फुंडे, ID: 30043

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर