🔹बारावीत 100 टक्के निकाल- 13 वर्षाची परंपरा कायम
गोंदिया-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 95.24 टक्के लागला असून लावण्या बहुउदेशीय शिक्षण संस्था व्दारा संचालित गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर येथील फुंडे विज्ञान महाविद्यालयाने उंच भरारी घेत 100 टक्के निकाल लावला आहे. या महाविद्यालयाने मागील 13 वर्षांपासून आपली 100 टक्के निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. आज 21 मे मंगळवार दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात फुंडे विज्ञान महाविद्यालयाची विध्यार्थिनी प्रीती प्रीतमलाल दमाहे हिने आयटी विषयात 98 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर धनश्री संजय जाधव हिने आयटी विषयात 92 टक्के गुण घेऊन दृतीय, आणि सायवी दिलीप बिसेन हिने आयटी विषयात 95 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे. फुंडे विज्ञान महाविद्यालयात आयटी विषयाचा परीक्षा निकाल उल्लेखनीय लागला असून परीक्षेत बसलेल्या एकूण 106 विद्यार्थ्यांपैकी आकांक्षा ईश्वरदयाल हेडाव या विध्यार्थिनीने आयटी विषयात 99 टक्के गुण घेतले आहे. 22 विध्यार्थ्यानी 95 टक्के, 42 विध्यार्थ्यानी 90 टक्के, 25 विध्यार्थ्यानी 85 टक्के, तर 17 विध्यार्थ्यानी 80 टक्के गुण आयटी विषयात घेऊन आपली प्रतिभा प्रदर्शीत केले आहे. संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र फुंडे, सचिव नितीन फुंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य सौ. शुभांगिनी भेंडारकर, प्रा. रितेश गजभिये, प्रा. कंचन शर्मा, प्रा. पूजा तूरकर, प्रा. पंकज ठाकरे, प्रा. जयेश कुंभलवार, प्रा. रवींद्र मस्करे, प्रा. प्रकाश पाथोडे, विनोद मते यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)