देवरी:- बिरसा मुंडा बहुउद्देशीय संस्था म्हैसुली मार्फत ग्रामीण भागात लोकांना त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी व महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यासाठी विविध योजना देणार आहेत व शेतकऱ्यांना वीस टक्के बिनव्याजी उद्योग करण्यासाठी पैसे देणार आहेत. या योजनेला राबवण्यासाठी तुकाराम मेंढे यांच्या घरी कार्यालय उघडण्यात आले व अजयकुमार भारतीय यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला सालई गावातील महिला व पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक एडवोकेट संजय शिंगाडे भंडारा कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयकुमार भारतीय(भंडारा) विशेष अतिथी मोहन कोल्हारे वनमजुर म्हैसुली कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांचे उपस्थित निलेश चेटुले भंडारा तुकाराम मेंढे सालई, रमेश पंधरे,विमलाबाई नेताम,रितेश मुनेश्वर कार्यक्रमाचे आयोजक ईश्वर कोल्हारे (बिरसा मुंडा संस्थेचे अध्यक्ष,)हे होते.व आभार प्रदर्शन रमेश पंधरे यांनी केले.




