देवरीः- ग्रामपंचायत संगणक परिचालक मागील संग्राम प्रोजेक्ट मध्ये काम करित आहेत.महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरावरुन प्रति संगणक परिचालक १२३३१ रुपये आपले सरकार सेवा केंद्राच्या नावाने जिल्हा परिषद च्या खात्यामध्ये वर्ग केल्या जातात.त्यानंतर जिल्हा परिषद च्या खात्यामधुन संचालक,राज्य व्यस्थापन कक्ष पुणे यांच्याकडे वर्ग केल्या जाते. त्यानंतर संचालक,राज्य व्यस्थापन कक्ष पुणे, कंपनी कडे वर्ग करते त्यानंतर कंपनी मानधन करते ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालक हे ग्रामपंचायत मधील विविध ऑनलाईन कामे व ऑफलाईन ठराव,गावातील विविध योजना संदर्भात ऑफलाईन कामे संगणक परिचालक करत आहेत.त्यांचा वर्षाचा मानधन एका वेळेस ग्रामपंचायत जमा करते पण ग्राउंड लेवल वर काम करणा-या संगणक परिचालकांना ५ ते ६ महीने मानधन दिल्या जात नाही. यामुळे ग्रामपंचायत मधील पदाधिकारी सुध्दा या विषयावर विचाराधिन आहेत. ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक कशा पध्दतीने आपले जिवन जगतील यांचा विचार शासनाने केला पाहीजे.कित्येक संगणक परिचालकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.सरकार आज ज्या योजनाचे सुभारंभ करित आहे त्या योजना ऑनलाईन करुन त्यांच्या पर्यंत पोहचविण्याची महत्वाची भुमिका ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी केले आहे.संगणक परिचालकांचे वर्तमान जिवन कसे जगावे हाच मोठा प्रश्न ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा झालेला आहे.
