Published:

*देवरी प्रकल्पातील आश्रमशाळेतील मुलांनी धावत्या नागपूर मेट्रो मध्ये रेखाटली महामहिम राष्ट्रपती महोदया यांची रांगोळीद्वारे कलाकृती..*

 महिला अधिकारी यांच्या हातावरती रेखाटली मेहंदी..*         एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक व शारीरिक विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन 1 ते 31 मे या कालावधीत बोरगाव येथील आश्रमशाळेत करण्यात आलेले आहे. यामधून अभ्यास दौऱ्याअंतर्गत नागपूर मेट्रो सफर आयोजन करण्यात आलेले होते मुलांचे समर कॅम्प मध्ये शिकलेल्या कलांचे दर्शन नागपूर मेट्रो मध्ये दिसून आले त्यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मूजी यांचे धावत्या मेट्रोमध्ये रांगोळी द्वारे रेखाचित्र रेखाटले तसेच क्ले आर्टस् वाल्या मुलांनी भगवान बिरसा मुंडा जी यांची कलाकृती तयार केली.विद्यार्थ्यांचे सोबत अपर आयुक्त श्रीमती आयुषी सिंग (IAS) व उपायुक्त श्री.दिगांबर चव्हाण, श्री.उमेश काशिद प्रकल्प अधिकारी देवरी,श्री. नितीन इसोकर प्रकल्प अधिकारी नागपूर,सहाय्यक प्रकल्प श्री. झाडें, श्री.सोनावणे, श्री.भुसारी, कपिल शर्मा, श्रीम.उईके, मेश्राम, मुख्याध्यापक श्री.खेडकर यांनी मेट्रो ने प्रवास केला तसेच संवाद साधला.सं गितामधील विद्यार्थ्यांनी मेट्रो मध्ये आदिवासी संगित गायन केले तसेच मेहंदी काढणाऱ्या मुलींनी महिला अधिकारी यांचे हातावरती चालत्या मेट्रोमध्ये मेहंदी रेखाटली यामुळे विद्यार्थी अतिशय उत्साहीत दिसून आले.तसेच त्यांच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसल्याचा आनंद स्पष्ट दिसून येत होता तसेच समर कॅम्प मध्ये शिकलेल्या कलेचा आत्मविश्वास दिसून येत होता.आदिवासी विद्यार्थ्यांचे साठी देवरी प्रकल्पाने ॲथलेटिक्स, संगीत, गोंडी-चित्रकला, क्ले-आर्ट, बांबू-आर्ट, मेहंदी, रांगोळी,नाशिक ढोल,आर्चरी, चेस व योगा आदींचे विविधअंगी बाबींचे प्रशिक्षण आयोजन केलेले आहे.मेट्रो प्रवासानंतर विद्यार्थ्यांनी रमण विज्ञान केंद्र येथेही भेट दिली यामध्ये मुलांना वेगवेगळ्या वैज्ञानिक बाबी जवळून पाहता आल्या. यामध्ये 3D शो मध्ये विद्यार्थ्यांनी थरार अनुभवला तर सौर तारामंडल मध्ये खगोलीय माहिती विद्यार्थ्यांना अनुभवता आली तसेच दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या बाबींच्या मागचे विज्ञान माहिती झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढवून त्यांना तर्कशुद्ध विचार करण्यास प्रेरणा मिळेल असे विद्यार्थ्यांनी आमच्या सोबत बोलताना सांगितले.या एक दिवशीय अभ्यास दौऱ्यामध्ये आदिवासी मुलांनी खूपसाऱ्या बाबी पहिल्यांदाच अनुभवल्या, अपर आयुक्त मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती बांबू पासून विविध वस्तू, कॅनवास वरती रेखाटलेल्या गोंडी पेंटिंग, मेहंदी, रांगोळी, क्ले या सर्व कला पाहून मुलांचे भरभरून कौतुक केले.निश्चितच या दौऱ्यामधून आदिवासी मुलेही कुठेही कमी नाहीत हे प्रकर्षाने दिसून आले,मा.ना.प्रा.डॉ.अशोक उईके मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांनी यादृष्टीने आदिवासी आश्रमशाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना समोर आणणे बाबत आयोजनाबाबत सूचना दिलेल्या होत्या तसेच मा. सचिव आदिवासी विकास श्री.विजय वाघमारे व मा.लीना बनसोड,आयुक्त आदिवासी विकास यांनी आदिवासी मुलांच्या कलांना उन्हाळी सुट्टीमध्ये वाव देणेसाठी समर कॅम्प व अभ्यास दौरा आयोजन बाबत दिशादर्शन केलेले होते.या भेटीमध्ये प्रामुख्याने नागपूर मेट्रो चे PRO संदीप शेंडे, रमण सायन्स चे पुल्लिंवार सर यांचे तसेच देवरी प्रकल्पामधील समर कॅम्प मधील सर्व प्रशिक्षक, प्रोग्रेसिव्ह कला विद्यालय प्रशिक्षक, सर्व मुख्याध्यापक,अधीक्षक, शिक्षक, निलेश राठोड,दिपेश मांडे,हटवार मोहनकर, फुंडे मॅडम, प्रफुल्ल बडोले या सर्वांचे सहकार्य लाभले../-अपर आयुक्त मॅडम यांच्या समोर धावत्या मेट्रोमध्ये मुलांनी जे कलाकृतीचे दर्शन घडवले त्यामुळे आदिवासी समुदायातील मुलेही विविधअंगी बाबी आश्रमशाळेतून शिकत आहेत हे दिसून आले.आदिवासी समुदायाच्या पालकांनी मुलांना आपल्या आश्रमशाळेत प्रवेश घ्यावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

                                             उमेश काशिद                                                           प्रकल्प अधिकारी,देवरी गोंदिया

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: *देवरी प्रकल्पातील आश्रमशाळेतील मुलांनी धावत्या नागपूर मेट्रो मध्ये रेखाटली महामहिम राष्ट्रपती महोदया यांची रांगोळीद्वारे कलाकृती..*, ID: 30553

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर