Published:

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीचे वर्चस्व कायम

20 संचालकीय जिल्हा मध्यवर्ती बँकेत 11 महायुती, 7 महाविकास आघाडी, तर 2 संचालक अपक्ष विजयी
साखरीटोला/गोंदिया (रमेश चुटे)
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 संचालक पदासाठी 29 रोजी मतदान झाले आणि 30 रोजी मतगणना करण्यात करण्यात यात महायुतीने मुसंडी मारली असून 20 संचालकीय गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेत 11 संचालक महायुतीचे 7 संचालक महाविकास आघाडीचे तर 2 संचालक अपक्ष निवडून आले आहेत. निवडून आलेल्या संचालकामधे आमगाव तालुका भेरसिंग नागपुरे (महायुती) देवरी तालुका प्रमोद संगीडवार (महायुती) सालेकसा तालुका बंटी कटरे (महाविकास आघाडी) गोंदिया तालुका केतन तूरकर (महायुती) सड़क अर्जुनी तालुका गंगाधर परशुरामकर (महाविकास आघाडी) गोरेगांव तालुका दुर्गा ठाकरे (अपक्ष) तिरोड़ा आमदार विजय रहांगडाले (महायुती)
औद्योगिक संघ- अरुण दुबे (महाविकास आघाडी),
मोरगांव/अर्जुनी पुस्तोडे (महायुती), दूध संघ- पंकज यादव (महाविकास आघाडी), मजूर संघ- राठौड़ (महाविकास आघाडी) जंगल कामगार संघ-गप्पू गुप्ता (महाविकास आघाडी), मच्छीमार संघ- बाला हलमारे (अपक्ष), डॉ. अविनाश जायसवाल (महायुति), रचना गहाने (महायुति) प्रिया हरिनखेड़े (महायुति) आमदार राजकुमार बडोले, (महायुति) विनोद कन्नमवार (महायुति) प्रफुल्ल अग्रवाल (महाविकास आघाडी निर्विरोध) राजेंद्र जैन (महायुति निर्विरोध) या संचालकांचा समावेश आहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आले होते. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा सहकार निबंधक विभागाने योग्य नियोजन केले होते. गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वपूर्ण समजली जाते. जिल्हा बँकेचे एकूण 20 संचालक असून, त्यापैकी माजी आमदार राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाल्याने प्रत्यक्षात 18 संचालक पदांसाठी ही निवडणूक झाली होती. जिल्हा बॅंक निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट यांनी सहकार पॅनल तयार करून निवडणूक लढवली आहे. तर काँग्रेस, राकापा शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, व इतर पक्षांसह परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूक लढवंली होती. ही निवडणूक खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली होती. तर भाजप नेत्यांनी सुद्धा या निवडणुकीत पूर्णपणे जोर लावला असल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीचे वर्चस्व कायम, ID: 30615

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर