Published:

शंकर मडावी यांचा मुलगा टिकेश मडावीचा पुरात वाहून मृत्यू

🔽मित्राच्या घरुन परत येताना घडला अपघात

🔽पुलापासून दोन किलोमीटर अंतरावर सापडला टिकेश मडावीचा मृतदेह सापडला.

साखरीटोला/सालेकसा-: सालेकसा तालुक्यातील दरेकसा येथील रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य व आदीवासी सेवक शंकरलाल मडावी यांचे चिरंजीव टिकेश मडावी (४५) यांचा जमाकुडो आणि कोपालगड दरम्यान वाहणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना २३ जुलैच्या रात्री दरम्यान घडली आहे.

२३ जुलैच्या सायंकाळी सालेकसा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र नाल्यांना पूर आल्याने तुडुंब भरून वाहत होते. मिळालेल्या माहितीनुसार 23 जुलैच्या सायंकाळी टिकेश मडावी कोपालगड येथील त्याचा मित्र दिनेश मडावी यांच्या घरी जेवण करायला गेला होता. मुसळधार पाऊस पडत असताना तो आपल्या मित्राच्या घरीच काही वेळ थांबून राहिला. रात्री दहाच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला. तेव्हा तो आपल्या स्कुटीने घरी परत येण्यासाठी निघाला होता. वाटेवर कोपालगड आणि तेलीटोला (जमाकुडो) दरम्यान वाहत असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना त्याने वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तो स्कुटी सह पुरात वाहून गेला. इकडे रात्री उशिरापर्यंत घरी पोहचला नाही म्हणून टिकेशच्या घरच्या लोकांनी त्याच्या मित्राच्या घरी कोपालगड येथे फोन केला. तेव्हा त्यांनी एक तासाआधीच घरी जाण्यासाठी निघून गेल्याचे सांगितले. तेव्हा वडील शंकरलाल मडावी आणि परिवातील लोक त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यावर पुलापासून दोन किलोमीटर अंतरावर टिकेश मडावी यांचा मृतदेह सापडला. सालेकसा पोलीसांनी घटनेची नोंद घेत मर्ग दाखल केला आहे. सालेकसा येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. मृतक टिकेश आपल्या मागे दोन मुलं पत्नी, आणि आई-वडील सोडून गेला आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शंकर मडावी यांचा मुलगा टिकेश मडावीचा पुरात वाहून मृत्यू, ID: 30635

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर