सालेकसा नप निवडणुक- नगराध्यक्ष पदाकरिता 14 तर नगरसेवक उमेदवारीचे 91 अर्ज दाखल

🔽सालेकसा नगरपंचायत निवडणुक…..

🔽अखेरच्या एकाचदिवशी एकूण 62 नामांकन अर्ज दाखल

साखरीटोला/सालेकसा:- (रमेश चुटे)
सालेकसा नगरपंचायतींसाठी उमेदवारी दाखल करण्याचा दि. 17 नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. या अखेरच्या एकाचदिवशी एकूण 62 नामांकन अर्ज दाखल झाले. यात 10 अर्ज नगराध्यक्ष पदासाठीचे असून 52 नामांकन अर्ज हे नगरसेवक पदासाठीचे आहे. अशाप्रकारे नामांकन सुरु होण्याच्या तारखेपासून ते अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 105 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. 14 नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदासाठी 2 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 15 रोजी नगरसेवक पदासाठी 5 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर 16 रोजी 4 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी आणि 32 जणांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर 17 नोव्हेंबर अखेरच्या दिवसी 10 जणांनी अध्यक्ष पदासाठी तर 52 जणांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असून अंतिम दिवसापर्यंत एकूण नगराध्यक्ष पदासाठी 14 आणि नगरसेवक पदांसाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारामधे भाजप कडून डाँ. राजेंद्र बडोले, कांग्रेस कडून विजय फुंडे, राष्ट्रवादी कांग्रेस (अप,गट) ब्रजभूषण बैस, राष्ट्रवादी कांग्रेस (शप,गट) मनोज डोये, शिवसेना (शिंदे, गट) मनीष असाटी, शिवसेना (उबाठा, गट) सौ. वंदनाताई क्षीरसागर, वंचित बहुजन आघाडी कडून कैलास गजभिये यांचा समावेश आहे. निवडणूक जाहीर कार्यक्रमानुसार, 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर होती. 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. अंतिम यादी 26 नोव्हेंबरला लागणार असून, चिन्हही त्याचदिवशी मिळणार आहे. सालेकसा नगरपंचायतींसाठी 1, नगराध्यक्ष आणि 17, नगरसेवकांची निवड करण्यासाठी आगामी 2 डिसेंबरला मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, 3 डिसेंबरला निकाल घोषित केला जाणार आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सालेकसा नप निवडणुक- नगराध्यक्ष पदाकरिता 14 तर नगरसेवक उमेदवारीचे 91 अर्ज दाखल, ID: 30757

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर