🔽नगराध्यक्ष पदाकरिता 7 उमेदवार निवडणूक रिंगणात
🔽17 नगरसेवक पदासाठी 63 उमेदवार मैदानात
साखरीटोला/सालेकसा:- (रमेश चुटे)
सालेकसा नगरपंचायतींसाठी उमेदवारीचा नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर होती. दरम्यान अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला असून आता 7 उमेदवार निवडणुकीच्या रींगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी राजकीय पक्षाच्या प्रमुख अधिकृत उमेदवारामधे भाजपचे डाँ. राजेंद्र बडोले, कांग्रेसचे विजय फुंडे, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे मनोज डोये, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सौ. वंदना क्षीरसागर, राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाचे ब्रजभूषण बैस, शिवसेना शिंदे गटाचे मनीष असाटी, वंचित बहुजन आघाडीचे कैलास गजभिये, यांचा समावेश आहे. अंतिम यादी 26 नोव्हेंबरला लागणार असून, चिन्हही त्याचदिवशी मिळणार असले तरी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे. एकूण 17 प्रभागांमधून 17 नगरसेवक आणि थेट जनतेतून निवडला जाणारा एक नगराध्यक्ष अशा या निवडणुकीसाठी 6 हजार 809 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून निर्देशीत दाखल नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रियाही 21 नोव्हेंबर रोजी संपली असून प्रचाराच्या सभा बैठकांचे सत्र अपेक्षित असतानाच शहरात चौकाचौकांत चर्चाचा जोर चांगलाच रंगत आहे.
प्रत्येक मतदाराला दोन मतदान करण्याचा अधिकार आहे. एक नगराध्यक्षासाठी आणि एक नगरसेवकांसाठी अशा दोन मतदानाच्या संधी मतदारानां मिळणार आहेत.
नगरपंचायतील एकूण 17 प्रभागांमधून प्रत्येकी 1 नगरसेवक निवडले जाणार असल्याने 17 नगरसेवकांची निवड होणार आहे.
निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच राजकीय चर्चा रंगत होत्या, परंतु आता अधिकृतपणे 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 1 नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, 17 नगरसेवक पदासाठी 63 उमेदवार आपले भाग्य आजमावीत आहेत. प्रचारात विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकण्याची मोहीम सुरू असून. सालेकसा नगरपंचायतींसाठी एकूण 1, नगराध्यक्ष आणि 17, नगरसेवकांची निवड करण्यासाठी आगामी 2 डिसेंबरला मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, 3 डिसेंबरला निकाल घोषित होणार आहे.




